Islampur Municipal Newsletter: Leaders Creating Environment for Eclection 
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर पालिका वार्तापत्र : नेत्यांची वातावरण निर्मिती; इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जि. सांगली) : नगरपालिका निवडणूक जवळ येत जाईल त्यानुसार नेते, कार्यकर्ते सक्रिय होताना दिसू लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नेत्यांनी वातावरण निर्मितीवर, तर इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनावर भर दिला आहे. शहरातील राजकीय वातावरण बदलत निघालेले दिसत आहे. संभाव्य परिस्थिती विचारात घेऊन सुरू असलेल्या हालचाली या राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवूनच सुरू आहेत की काय असे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी संधी मिळविण्यासाठी म्हणून काहींचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. 

विविध सण, उत्सव आणि वाढदिवस यासारखे औचित्य साधून पदाधिकारी आपापल्या प्रभागात आणि कार्यकर्ते संबंधित नेत्यांकडे संपर्क वाढवत असल्याचे चित्र आहेत. सत्ताधारी विकास आघाडीच्या गोटात तूर्तास शांतता असली तरी अंतर्गत पातळीवर आपापल्या गटाच्या हालचाली दिसत आहेत. प्राथमिक टप्प्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र वातावरणनिर्मितीवर भर दिलेले दिसत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि प्रतीक पाटील यांनी शहरात कोपरासभा घेतल्या. लोकांशी संपर्क साधताना कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याची भूमिका घेतली. या बैठकांमुळे कार्यकर्ते रिचार्ज झाले आणि इच्छुकांची संख्या वाढली. 

अलीकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक शहाजी पाटील यांनी आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला. शहरात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांच्या अभिनंदनाचे फलक लावले होते. शिवाय प्रभागात विविध ठिकाणी उपक्रमदेखील पार पडले. जयंत पाटील वाढदिवसाच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवले. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व नगरसेवक खंडेराव जाधव यांनी त्यांच्या कार्यालयाचे उद्‌घाटन मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते घेतले.

शिवाय त्यांच्या पत्नी सातारा वूमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रूपाली जाधव यांनी हळदी-कुंकू कार्यक्रम घेतला. शिवाय जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत कबड्डी प्रीमियर लीगचेही आयोजन करून वातावरण निर्मिती केली आहे. नगरसेविका श्रीमती सुनीता सपकाळ यांची बांधकाम समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतरही त्याची जोरदार प्रसिद्धी करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या पत्नी व विद्यमान नगरसेविका मनीषा पाटील यांनीही हळदी-कुंकू समारंभ घेत महिलांना मोठ्या प्रमाणात निमंत्रित केले होते. माजी नगराध्यक्ष चिमन डांगे यांनीही धनगर समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर राज्यस्तरीय मेळावा घेतला. 

नगरपालिका सर्वसाधारण सभेत आपापल्या प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आणि विकासासाठी भांडण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. मागील पालिका निवडणुकीनंतरच्या काळात मधल्या चार वर्षांत कमी पडत गेलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील "पार्टी स्पिरिट' वाढताना दिसत असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यातील मतभेद मिटणे अवघड आहे. 

एकीचा अभाव 
सत्ताधारी विकास आघाडीकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले असले तरी विकास आघाडीतील घटकपक्ष प्रतिनिधी एकत्र दिसत नाहीत, त्यांच्यातील दुफळी मिटविण्यासाठी म्हणून विशेष प्रयत्नांची गरज आहे, पण तूर्तास त्यासाठी पुढाकार कोण घेणार? हा प्रश्न आहे. वाळवा तालुका संघर्ष समिती विविध प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरताना दिसत आहे. त्यांची राजकीय भूमिका अद्याप पुढे आली नसली तरी दावेदार म्हणून ते पुढे येऊ शकतात. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT