islampur Municipal Council
islampur Municipal Council sakal
पश्चिम महाराष्ट्र

हजेरी पालिकेकडे, काम मात्र खासगी ठिकाणी!

सकाळ वृत्तसेवा

नगरपालिकेकडे ठेक्याने कामाला असलेले कामगार पालिकेचे काम सोडून काही लोकप्रतिनिधीच्या खासगी मालमत्तांमध्ये काम करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.

इस्लामपूर (जिल्हा सांगली) - नगरपालिकेकडे ठेक्याने कामाला असलेले कामगार पालिकेचे काम सोडून काही लोकप्रतिनिधीच्या खासगी मालमत्तांमध्ये काम करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव साबळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. संबंधित ठेकेदाराला त्या कामगारांना या ठेक्यातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्याधिकारी साबळे म्हणाले, "शहरातील तिरंगा चौक, नेहरूनगर, इंदिरा कॉलनी, टकलाईनगर या भागात रस्तेसफाई, स्वच्छता याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. या ठिकाणी सहा जणांची नियुक्ती असूनही काम होत नाही म्हणून माहिती घेतली तर इथले लोक हे इकडे हजेरी लावतायत पण काम दुसऱ्याच खासगी मालमत्तांवर करतायत असे निदर्शनास आले. यातून पालिकेचे दुहेरी नुकसान होत आहे. पालिकेचे पैसेही वाया जातायत आणि स्वच्छताही होत नाहीये. या सहा जणांना सेवेतून काढून त्याजागी नवे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. एकीकडे प्रभागात कामे होत नाहीत म्हणून ओरडायचे आणि दुसरीकडे त्याच कामगारांना आपल्या खासगी जागेत कामाला लावण्याची प्रवृत्ती वाईट आहे. पुन्हा हेच लोक पालिकेच्या नावाने जाणीवपूर्वक तक्रारी आणि ओरड करत आहेत. कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास जाणीवपूर्वक मज्जाव केला जात असल्याच्याही तक्रारी आहेत."

ते म्हणाले, 'यापुढे तिरंगा चौक, नेहरूनगर, इंदिरा कॉलनी, टकलाईनगर या भागावर पालिकेचे विशेष लक्ष राहील. एक पथक नेमले जाईल. इथल्या स्वच्छतेच्या अनुषंगाने तक्रारी असल्यास नागरिकांनी थेट पालिकेशी संपर्क साधावा. स्वच्छतेच्या नव्या ठेक्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करत आणली आहे. १ जूनपासून ठेकेदार बदलणार आहे. बचतगटांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन करण्याचे नवे मॉडेल विकसित करण्यावर भर आहे.'

नव्या ठेक्यात ४१ लाख वाचले!

शहरातील स्वच्छतेच्या ठेक्यावर चालूवर्षी ३ कोटी ८२ लाख खर्च झाले. परंतु आता नव्याने एक जूनपासून सुरू होणाऱ्या ठेक्यात पालिकेने शहराचे ४१ लाख वाचवले आहेत. ३ कोटी ४१ लाखांचे वार्षिक टेंडर अमलात येणार असल्याचे मुख्याधिकारी साबळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT