Islampur property tax hearing; Dates postponed 
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर मालमत्ता करवाढ सुनावणी; तारखा पुढे ढकलल्या

धर्मवीर पाटील

इस्लामपूर : मालमत्ता आकारणी करवाढ प्रकरणी नगरपालिका प्रशासनाने निश्‍चित केलेल्या सुनावणीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. डिसेंबर महिन्यात 28 ते 31 तारखेदरम्यान होणारी सुनावणी आता जानेवारी महिन्याच्या 19 ते 21 तारखेदरम्यान होणार आहे. तोपर्यंत नागरिकांना अपिले दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. 

शहरातील नागरिकांना आलेल्या घरपट्टी बिलांच्याबाबत असलेला रोष विचारात घेता पालिका प्रशासनाने अपिलीय समितीच्या माध्यमातून सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले होते. ही सुनावणी 28 ते 31 डिसेंबर दरम्यान होणार होती. त्याआधी नागरिकांनी आपली अपिले दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. 

शहरातील घरपट्टी, उपयोगकर्ता कराची आकारणी यावरून प्रशासनाच्या विरोधात नागरिकांच्यातून नकारात्मक प्रतिक्रिया उमटत होत्या. शहर शिवसेना, वाळवा तालुका संघर्ष समिती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या बिलांना आक्षेप घेतला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने येत्या 28 ते 31 डिसेंबरदरम्यान अपील समितीमार्फत सुनावणी ठेवली होती. या समितीत तीन लोकप्रतिनिधी व दोन शासकीय सदस्य आहेत. नागरिकांच्याकडून येणाऱ्या अपिलांचा विचार करून ही समिती निर्णय जाहीर करणार आहे. या समितीमार्फत नागरिकांना दिलासा मिळेल आणि करात सवलत मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण यापूर्वी अपील समितीने तसे निर्णय दिले आहेत. शहरात विविध झोननिहाय मालमत्ता कराची आकारणी जाहीर केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. आताही तसाच निर्णय होण्याची शक्‍यता आहे; परंतु आता ही सुनावणी जानेवारी महिन्यात होणार असल्याने ज्या नागरिकांना अपील दाखल करण्यास विलंब होत होता, अशांना आता मुदतवाढ मिळणार आहे. 

प्रशासनाचे आवाहन 
ज्या नागरिकांनी मार्च महिन्यात बिलाच्या पन्नास टक्के रक्कम भरून अपिले दाखल केली होती, त्यांनी आता पुन्हा अपील करण्याची गरज नाही, तर ज्यांची राहून गेली आहेत; त्यांनी ती प्रक्रिया करावी, असे प्रशासन व विविध राजकीय पक्षांनी आवाहन केले आहे. 

"अपील समितीचे प्रमुख उपविभागीय अधिकारी असतात, त्यांच्या सूचनेनुसार सुनावणी प्रक्रियेच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे.' 
- अरविंद माळी, मुख्याधिकारी.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT