It is the aspirations of the constituency to get a minister 
पश्चिम महाराष्ट्र

मंत्रिपद मिळावे ही चाहत्यांची इच्छा 

सकाळ वृत्तसेवा

नगर : ""महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे राजकीय वर्तुळात एक नवी दिशा मिळाली. लोकहितासाठी झालेली आघाडी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये जिल्हास्तरावर व्हावी, सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळावे, ही मतदारसंघातील चाहत्यांची इच्छा आहे; परंतु पदापेक्षाही जनतेची कामे महत्त्वाची आहेत. विकासकामांसाठी आलेल्या निधीतील दमडीही अखर्चित राहणार नाही,'' असा निर्धार आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात काल (मंगळवारी) जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध कामांचा आमदार पवारांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""कुकडीचा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आहे. जिल्ह्यात भेदभाव करण्याचे कारणच नाही. "कुकडी'च्या पाणीवाटपात कोणावरही अन्याय होणार नाही. मुळात "कुकडी'संदर्भात योग्य नियोजनाची गरज आहे. "कुकडी' चारीचे रखडलेले अस्तरीकरणाचे काम युद्धपातळीवर मार्गी लागेल. कर्जत-जामखेड मतदारसंघात आगामी दीड महिना महाराजस्व अभियान राबविणार आहे.

अभियानातून सर्वसामान्य जनतेपर्यंत योजना पोचविल्या जाणार आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात "कुकडी' भूसंपादन, कृषी महाविद्यालय, कर्जतचा बस डेपो, अशी अनेक कामे वर्षानुवर्षे रखडली. मागील काळात अनेक गोष्टींचा नुसता गवगवा झाला. मतदारसंघातील प्रलंबित राहिलेली विकासकामे योग्य नियोजन करून मार्गी लावली जातील. विकासकामे करताना ती दर्जेदार व्हावीत, यासाठी आपण आग्रही आहोत.'' 

सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात जनता शांततेत आंदोलन करीत असेल, तर त्यांच्यावर हात उचलता कामा नये. आंदोलकांवर देशात अनेक ठिकाणी लाठीमार झाला. त्याचा आपण निषेध करतो. नोटाबंदी, कर्जमाफीसाठी नागरिकांना रांगेत उभे केले होते. आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा रांगेत उभे करणार का, असा प्रश्‍नही पवार यांनी उपस्थित केला. 

नूतन इमारतीचे उद्‌घाटन महसूलमंत्र्यांच्याच हस्ते 
""नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. थोरात पुन्हा पाच वर्षांनी एकवार महसूलमंत्री झाले. त्यामुळे रखडलेल्या इमारतीच्या उर्वरित निधीचा मार्ग मोकळा होईल. नूतन इमारतीच्या कामांचे उद्‌घाटनही त्यांच्याच हस्ते होईल,'' असा विश्‍वास आमदार पवार यांनी व्यक्त केला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT