Jabhulni Women Police Patil Girls Riched At  Home Sangli Marathi News
Jabhulni Women Police Patil Girls Riched At Home Sangli Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

भरकटलेल्या `त्या` मुलींना महिलेने पोहोचविले असे घरी

सकाळ वृत्तसेवा

 झरे (सांगली) : ता ८ जानेवारी. वेळ  दुपारी 4 ची. जांभुळणी गावामधून दोन अनोळखी मुली इकडून तिकडे फिरत होत्या. फिरता फिरता किरण वागिरे यांच्या दुकानात जातात तिथे त्यांचे बंधू शंभू वागीरे बसले होते. त्या दोन अनोळख्या मुलीने त्यांना मोबाईल मागितला. आम्ही चुकलो आहे, आम्हाला घरी फोन करायचा आहे तुमचा मोबाईल द्या. असं म्हटल्यानंतर शंभू वागिरेंना शंका आल्याने त्यांनी कॉल रेकॉर्ड सुरू ठेवले.

फोन झाल्यावर त्याने ते रेकॉर्ड ऐकले व लगेच पोलिस पाटील अनिता पाटील या  घटनास्थळी हजर झाल्या. अनिता पाटील यांनी त्यांना आपल्या घरी नेले व विचारपूस केली. त्या दोन मुली पहिल्यांदा सत्य बोलत नव्हत्या. परंतु पाटील यांनी थोडासा पोलिस पाटलांचा रुबाब दाखवल्यानंतर त्यांनी खरं सांगितले. त्यानंतर अनिता पाटील यांनी त्यांच्या आई-वडिलांना भावांना फोन केला आणि त्यांना बोलावून घेतले. ते रात्री अकरा वाजता जांभुळणी येथे पोहोचले. त्यानंतर चार चाकी वाहन करून त्या मुलींना रात्री एक वाजता सुरक्षित घरपोच केले. स्वतः अनिता पाटील सोबत गेल्या होत्या. 

भीतीपोटी त्या बोलल्या नाहीत

घडलेली हकीगत अशी की, त्या दोन्ही मुली इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहेत. त्या दोघी  मित्राच्या वाढदिवसाला गेल्या होत्या. परंतु वर्गांमध्ये शिक्षिकेला वेगळाच संदेश गेल्याने त्या भडकल्या. त्यामुळे आपल्याबद्दल गैरसमज झाला आहे असे वाटल्याने त्या मुलीच्या मनाला वाईट वाटले व मनात अनेक विचार येऊ लागले. घरी समजले तर घरातील  या आेरडतील या भीती पोटी मुलींची मने भरकटली व भीतीपोटी मिळेल त्या वाहनाने जायचे त्यांनी ठरवले. जांभुळणी गावापर्यंतच येण्या पुरते त्यांच्याजवळ पैसे होते. दोघीही मुलींचे वडील मोलमजुरी करून जगतात.

मुलींना सुरक्षित घरपोच केलं

अनिता पाटील यांनी याबाबत कोणतीही चर्चा  समाजापुढे  न करता त्या दोन्ही मुलींना सुरक्षित घरपोच केले. अशा कर्तव्यदक्ष पोलिस पाटील अनिता पाटील यांच्या या कार्याबद्दल गावातून व परिसरातून काैतुक  होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT