listen to what this soldier azad hind sena is syaing 
पश्चिम महाराष्ट्र

जय हिंद : आझाद हिंद सेनेतील हा शिपाई काय म्हणतोय ऐका...

मार्तंड बुचुडे

पारनेरः सुभाषचंद्र बोस यांचे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आकर्षक आहे. त्यांच्या कार्याविषयी आणि मृत्यूविषयी आजही गूढ कायम आहे. त्यांच्या जीवनावर अनेक कादंबऱ्या व चित्रपट आले. परंतु तेही वादग्रस्त ठरले. त्यांनी भारताची ब्रिटिशांच्या तावडीतून भारताची सुटका करण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.त्या सैन्यात पारनेरच्या एका शूर पुत्राचा समावेश होता. ते आज हयात आहेत. वयाची शंभरी गाठली असली तरी आझाद हिंद सेनेतील त्या रोमांचक आठवणीने खवळून उठतात. सुभाषबाबूंविषयीही ते अनेक आठवणी सांगतात.

तो काळच भारलेला होता

आजही सुभाष बाबूंचे नांव घेताच अंगावर रोमांच उभे रहातात. सुभाष चंद्र बोस आज देशाला हवे होते देशाला त्यांची गरज होती. आज अनेकांचे देश प्रेम हे फक्त राजकाराणासाठी आहे. आम्ही आझाद हिंद सेनेत सुमारे पाच वर्षाहून अधिक काळ घालविला. केवळ देशासाठी त्या काळात कधीही आम्हाला आमच्या कुटुंबाची किंवा घरची साधी आठवण सुद्धा  झाली नाही,  असे आझाद हिंद सेनेत सुभाषबाबू यांच्या सोबत काम केलेल्या व अवघ्या ९९ वर्ष वयाच्या तरूण स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ रावजी शिंगोटे अभिमानाने सांगतात.

सुभाषबाबूंमुळे आमची जपानमधून सुटका

अवघी इयत्ता दुसरीपर्यंत शिक्षण झालेल्या स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ रावजी शिंगोटे यांचा जन्म १९२१ साली झाला. ते घाणेगाव (ता. पारनेर) येथील रहिवाशी आहेत. सध्या त्यांनी शंभरी गाठली आहे. त्यांच्या अंगात देशप्रेम नसानसातून भरलेले दिसून येते. शिंगोटे सकाळशी बोलताना म्हणाले, मी १९३९साली ब्रिटीश फौजेत दाखल झालो. काही दिवसातच आम्हाला ब्रिटीश सरकारने १९४२च्या  सुमारास  जपानच्या मोहिमेवर पाठविले. मात्र, आमचे नशिब असे की आम्ही जपान सरकारच्या ताब्यात सापडलो. त्या सरकारने आम्हाला सुमारे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ तुरूंगात डांबले. त्याच काळात सुभाषबाबू यांनी पाणबुडीतून प्रवास करत जपान गाठले. तेथे येऊन जपान सरकारशी बोलणी केली.  त्यानंतर आमची सुटका झाली.

आझाद हिंद सेनेची स्थापना

 त्या ळात सुभाषबाबूंनी सुमारे ७५ हजार तरूणांना बरोबर घेऊन आझाद हिंद सेना स्थापन केली होती. आम्ही त्या सेनेत दाखल झालो. त्या नंतर सुमारे पाच वर्ष आम्ही आमच्या घरापासून दुरावलो होतो. घरच्या मंडळींनी आम्ही युधात सापडलो किंवा मारलो गेलो म्हणून आमची आशा सोडून दिली होती. आम्हीही पाच वर्षात कधी घऱी संपर्क केला नाही किंवा आम्हाला देश प्रेमापुढे कधीच कुटुंबाची व घराची आठवण झाली नाही. आम्ही आमच्या कुटुंबाचा संपर्क तोडल्याने आमच्या घरच्या लोकांनी आम्ही युद्धात मारलो गेलो किंवा कैदेत आमचा शेवट झाला असे समजून आमची वाट पाहाणेच सोडून दिले होते. 

आझाद हिंद सेनेविषयी आठवणी

आजही शिंगोटे यांचे देशा विषयीचे प्रेम कमी झाले नाही. त्यांच्या रोमारोमात देशप्रेम भरून भरले असल्याचे त्यांच्याशी बोलताना क्षणोक्षणी जाणवत होते. त्यांना आता कमी ऐकू येते. त्यांच्याशी संवाद साधताना मोठी अडचण होते. मात्र आझाद हिंद सेनेविषयी आठवणी सांगताना ते तरूण होतात. आणि जय हिंदचा नारा देतात मग आपल्याही अंगात वीरश्री संचारतो.

चालता बोलता दस्तावेज
 शिंगोटे यांना एक मे १९८६साली महाराष्ट्र सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री वसंत दादापाटील यांचे हस्ते  सन्मान पत्र देऊन गौवरवले. तसेच  १९७२साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्रपत्र भेट देऊन त्यांचा गौवर करण्यात आला आहे. ते खरं तर मोठा दस्तावेज आहेत. परंतु त्यांच्या योगदानाची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT