Sangli Bandh Maratha Reservation Maratha Kranti Morcha esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Bandh : जालन्यात मराठा समाजावर लाठीचार्ज; सांगलीत क्रांती मोर्चा आक्रमक; बसस्थानक परिसरात पेटवल्या टायरी

मराठा क्रांती मोर्चानं सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज सांगलीत कडकडीत बंद पाळण्यात आला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात आहे.

सांगली : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं आंदोलनावेळी (Jalna Maratha Andolan) सकल मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चानं सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे.

त्याला विविध समाज संघटना, व्यापारी संघटना, श्री शिवप्रतिष्ठान, रिक्षा, पानपट्टी असोसिएशन, हॉटेल संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात आहे.

दरम्यान, आज सकाळी येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात टायर पेटवल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं. मराठा क्रांती मोर्चानं बंद शांततेत पाळण्याचं आवाहन केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी येथील स्टेशन चौकात देण्यात आल्या.

Sangli Bandh Maratha Reservation Maratha Kranti Morcha

सकाळी दहाच्या सुमारास आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती. हातात भगवे झेंडे घेत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठांसह सर्व व्यापाऱ्यांनी स्वयं स्फूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदवला. रिक्षा संघटना, हॉकर्स, हातगाडी, पानपट्टी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT