Jamkhedkars tension increased 
पश्चिम महाराष्ट्र

जामखेडकरांचे टेन्शन वाढले ः काय करायचं ते आत्ताच करा नाही तर वेळ निघून जाईल

वसंत सानप

जामखेड : जामखेड येथे दररोज कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ झोप उडवणारी आणि जामखेडवरच संकट गडद करणारी आहे. येथील लोकसंख्येच्या घनतेच्या तुलनेत येथे आढळणारी रुग्ण संख्या राज्यात लक्षवेधी ठरणारी आहे. वेळीच येथे होणारा फैलाव रोखला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊन संपूर्ण तालुका रोगाच्या छायेखाली सापडू शकतो. याचा प्रादुर्भाव शेजारच्या चार जिल्ह्यांमध्ये पसरु शकेल, त्यावेळी प्रशासनाचे सर्व उपाय तोकडे पडतील. हे ओळखून वेळीच खबरदारी म्हणून उपाय योजना हाती घेण्याची आवश्यकता आहे. कारण कोरोनाच्या भीतीने जामकेडकरांनी जीव मुठीत धरला आहे.

जामखेड शहरातील तीन भागांमध्ये मिळून हे सतरा रुग्ण सापडले आहेत. सुरुवातीला काझी गल्ली आणि तपनेश्वर गल्लीत कोराना बाधित रुग्ण सापडले. त्यानंतर नुराणी कॉलनीत रुग्णांची मोठी संख्या मोठी आहे. जामखेमधील एकूण दीडशे व्यक्तींच्या स्वॅब तपासण्या झाल्या आहेत. त्यात सतरा व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या. रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी वाढविणारी ठरते आहे.

जामखेड 'हाँटस्पाँट' म्हणून जाहीर केले आहे. नुराणी काँलनी 'सील'  केली आहे. येथून बाहेर जायचे नाही आणि येथे बाहेरून  यायचे मार्ग बंद केले आहेत. येथे राहणाऱ्या सर्व नागरिकांना सर्व अत्यावश्यक सुविधा प्रशासनाकडूनच पुरविल्या जाणार आहेत. जामखेड शहरांतील हाॅटस्पाॅट भागांसह सर्व शहरातील नागरिकांचे स्क्रिनिंग व शक्य असल्यास कोरोना चाचण्या करणे गरजेचे आहे. सध्या अवघ्या १५ मिनिटांत चाचणी घेणारी यंत्रणा नव्याने भारतात विकसित झाली आहे. त्याचा जामखेडमध्ये प्राधान्याने उपयोग होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार व प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा. हायड्रोक्लोरोक्वीन गोळ्या व प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करून घ्यावा.

शहरातील व तालुक्यातील सर्व खासगी रुग्णालये, हाॅटेल्स, लाॅज, मंगल कार्यालये आदी ताब्यात घेऊन रुग्णांच्या व संशयीतांच्या विलिनीकरणासाठी सज्ज ठेवावेत. ग्रामीण भागातील इतर आजाराने त्रस्त रुग्णांना जामखेडऐवजी खर्ड्यासारख्या सर्व सोयींनीयुक्त इतर खासगी रुग्णालयात शिफ्ट करावे.

ग्रामीण भागात फैलाव रोखण्याची ही खबरदारी घ्यावीच लागेल

  • हॉटस्पॉट असल्याने वाहतूक रोखण्याची आहे गरज
  • जामखेड तालुक्यातील सेवा करणारे कर्मचारी ग्रामीण व शहरी असे दोन्ही भागात वास्तव्य करणारे आहेत. तर तालुक्यातील विविध विभागप्रमुख जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. हे ठरु शकतात.
  • हे टाळण्यासाठी शहरातील वास्तव्यास असणारा एकही कर्मचारी ग्रामीण भागात पाठवू नये आणि ग्रामीण भागातील एकही कर्मचारी शहरात पाठवू नाही.
  • जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तालुक्यात प्रवेश देऊ नये, ते आले तर त्यांना कर्तव्याच्या ठिकाणीच रहाणेच बंधनकारक करायला हवे. अन्यथा त्यांच्या माध्यमातून 'फैलाव ' होण्याची भीती आहे.
  • या कामात ज्या ठिकाणी कर्मचारी कमी पडतील, तेथे कंत्राटी कर्मचारी नेमावेत. मात्र, कर्मचाऱ्यांचा तालुक्यात होणारा प्रवास टाळावा.
  • हाँटस्पॉट असलेल्या ठिकाणाहून मिळणाऱ्या सेवा थांबवाव्यात
  • जामखेड शहरातून ग्रामीण भागात पुरविल्या जाणाऱ्या व ग्रामीण भागातून जामखेडला पुरविल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा बंद कराव्यात. यामध्ये दुध, पाणी, किराणा या प्रमुख सेवांचा आंतरभाव होतो.चार चाकी प्रमाणे दुचाकीच्या प्रवासाला हवी आहे बंदी.
  • चारचाकी वाहनाप्रमाणेच दुचाकीच्या माध्यमातून व्यक्ती एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात प्रवास खुशकीच्या मार्गाने करतात. हे रोखण्यासाठी दुचाकीच्या प्रवासालाही निर्बंध घालायला हवेत.
  • चारचाकी व दुचाकी वहानांना मिळाणारी पेट्रोलची सुविधा दररोज काही तासांसाठी सुरु आहे. यावेळेत वाहनात पेट्रोल व डिझेल भरतात आणि संधी मिळाली की प्रवास होतो. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बरेचसे गैरफायदा उचलताहेत, हे थांबायला हवे.
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Latest Marathi News Updates : जालन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशी पीक गेलं पाण्याखाली

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

SCROLL FOR NEXT