Jayant Patil Pratik Patil  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election: 'सांगली, हातकणंगलेतून प्रतीकसाठी चाचपणी'; जयंत पाटलांचे नव्या मांडणीचे संकेत, शेट्टींच्या मतदारसंघात एन्ट्री?

अजित पवार यांनी बंड करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या मतदार संघांवर दावा केला होता, त्यात सांगलीचा समावेश नव्हता.

सकाळ डिजिटल टीम

'हातकणंगले मतदार संघाबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमच्यासमवेत कोणतीही चर्चा केलेली नाही.'

सांगली : ‘‘माझा मुलगा प्रतीक पाटील (Pratik Patil) याने सांगली किंवा हातकणंगले लोकसभा मतदार संघातून लढावे, अशी मागणी आहे. त्यासाठी चाचपणी केली आणि दोन्ही ठिकाणी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही,’’ असे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नव्या मांडणीचे संकेत दिले आहेत.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगली लोकसभा मतदार संघातून प्रतीक पाटील यांचा दावा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट संकेत दिले. काँग्रेस (Congress) आणि विशाल पाटील यांना त्यामुळे धक्का बसू शकतो, अशी शक्यता आहे. जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक याने हातकणंगले किंवा सांगली मतदार संघातून भाजपकडून लोकसभा लढवावी आणि त्याआधी जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशा चर्चा आहेत.

तसा दबाव आहे का,’ असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना जयंतरावांनी, प्रतीक पाटील यांना लोकसभा आखाड्यात उतरवण्याची चाचपणी ताकदीने करण्यात आल्याचे स्पष्ट सांगितले. दरम्यान, जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या ‘चाचपणी’ प्रक्रियेच्या माहितीने सांगली लोकसभा मतदार संघातील सगळे डाव अद्याप खुले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार यांनी बंड करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या मतदार संघांवर दावा केला होता, त्यात सांगलीचा समावेश नव्हता. परंतु, काँग्रेसमध्ये कोण लढणार, याबाबत एकवाक्यता होण्यात आणि विशाल पाटील यांच्याकडून ‘होकार’ येण्यात दिरंगाई होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांनी आपला डाव मांडला आहे का, याची चर्चा रंगली आहे.

‘शेट्टींशी चर्चा नाही’

आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘‘हातकणंगले मतदार संघाबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमच्यासमवेत कोणतीही चर्चा केलेली नाही. महाविकास आघाडीची चर्चा झाली, तेव्हा हातकणंगले मतदार संघाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आपली काही मते मांडली; मात्र त्या मतदार संघाचा निर्णय झालेला नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT