jayant patil said in sangli primary health centres and primary schools development in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत करणार : जयंत पाटील

शामराव गावडे

नवेखेड (सांगली) : येत्या काही दिवसात सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत बनविणार असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. रेठरे हरणाक्ष (ता.वाळवा) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उदघाटन व इतर विकास कामांचे लोकार्पण असा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बी. डी पवार अध्यक्षस्थानी होते.

दिलीपराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, कृष्णेचे संचालक सुजित मोरे, विनायकराव पाटील, विजय पाटील, संग्राम पाटील, माजी सभापती सचिन हुलवान, उपसरपंच निलेश पवार, उमेश पवार, खरातवाडीचे माजी सरपंच अविनाश खरात, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटाने आरोग्याचे महत्व लोकांना कळले आहे. भविष्यात सरकारी यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्रे, अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले जाईल. यामध्ये किमान प्राथमिक तपासणीच्या सुविधा असतील. त्याचबरोबर प्राथमिक शाळा ही सुंदर केल्या जातील. पहिल्या टप्प्यात १४१ शाळा यासाठी निवडल्या आहेत. नंतर इतर शाळाही हळूहळू घेतल्या जातील. तसेच भविष्यात क्षारपडीचे प्रमाण वाढू नये, जमिनी टीकाव्यात यासाठी शासन स्तरावर ८० टक्के रक्कम सरकार व वीस टक्के रक्कम शेतकऱ्यांची आशा पद्धतीची योजना राबविण्याचा विचार असुन त्यासाठी प्राथमिक काम सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. अजुनही कोरोनाचे थोडेफार सावट आहे. काळजी घ्या असे आवाहव त्यांनी केले. यावेळी ग्रामास्थांच्या वतीने मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हापरिषदच्या वतीने विविध योजनांचा लाभ मतदार संघात मिळवून दिल्याबद्दल धनाजी बिरमुळे यांचा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नंदकुमार कोळेकर, उमेश कोळेकर, संदीप जाधव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम बापू कारखान्याचे संचालक दादासाहेब मोरे यांनी आभार मानले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

Marathwada News : “साहेब, आम्हाला पण भीती वाटते!” पीक वाचवायचं की जीव; निल्लोड परिसरात अंधारात गहू भरणी करताना शेतकरी धोक्यात!

Sanjay Khodke Accident : राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात; पक्षाच्या बैठकीला दुचाकीने जात असताना कारने दिली धडक!

Alcohol Risk : दारू पिऊन झाल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' 3 पदार्थ; नाहीतर हँगओव्हर होईल डबल अन् लवकरच गमवाल जीव

Karad Kidnapping Case : गाडी अडवली, मारहाण केली अन् उचलून नेलं; कऱ्हाडजवळ व्यापाऱ्याचे सिनेमा स्टाईल अपहरण!

SCROLL FOR NEXT