Jayant Patil supporter former corporator Jamil Bagwan joins Ajit Pawar group esakal
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : सांगली जिल्ह्यात जयंत पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम'; कट्टर समर्थकाचा अजितदादा गटात जाहीर प्रवेश

माजी नगरसेवक जमील बागवान (Jameel Bagwan) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटांत प्रवेश केला.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांना अजितदादा पवार गटांकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते.

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जमील बागवान (Jameel Bagwan) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटांत प्रवेश केला. सांगली शहर-जिल्हा कार्याध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचे कट्टर समर्थक म्हणून बागवान यांची ओळख होती. मात्र त्यांनी अजितदादा गटामध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, पक्षाने दिलेली जबाबदारी निःस्वार्थपणे पार पाडू पक्षसंघटन मजबूत करण्याची ग्वाही बागवान यांनी दिली. जमील बागवान हे राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचे बंधू आहेत. मिरज शहरातील राष्ट्रवादीचे संघटन भक्कम करण्यात जमील बागवान यांचा सिंहाचा वाटा आहे.

दरम्यान, पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधीही दिली होती. या काळात त्यांनी कोट्यवधी रुपयांची कामे केली. मात्र स्थानिक नेतृत्वाबाबत त्यांची नाराजी होती. राष्ट्रवादीत त्यांना डावलण्यात येत होते. त्यामुळे ते नाराज होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांना अजितदादा पवार गटांकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

अखेर मुंबई येथे त्यांनी अजित गटात प्रवेश केला. त्यांच्यावर सांगली शहर-जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सांगली शहर-जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर तथा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रिय नायकवडी यांच्यासह महापालिका क्षेत्रातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT