पश्चिम महाराष्ट्र

डॉ. शितलताई मालुसरे यांना "जिजाऊ गौरव' पुरस्कार जाहीर 

सकाळवृत्तसेवा

वारणानगर - बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील गडकोट मोहीम परिवारातर्फे राजमाता जिजाऊ जयंती व जिजाऊ गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन 12 जानेवारीला केले आहे. यावर्षीचा "जिजाऊ गौरव' पुरस्कार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या विद्यमान वंशज डॉ. शितलताई मालुसरे (रा. महाड) यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिली. 

बहिरेवाडी येथील भैरवनाथ देवालयाच्या पटांगणात 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सोहळ्याचे आयोजन केले आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराजे बाजी मोहिते (रा. तळबीड) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. 

गेली तीन वर्षापासून या जिजाऊ जयंती सोहळ्याचे आयोजन केले जाते. पहिल्या वर्षी सीमा वसंत जाधव आणि सुनीता राजेश जाधव यांना जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित करून शालेय मुलांना ऐतिहासिक वस्तूंची ओळख व्हावी, यासाठी चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले होते.

दुसऱ्या वर्षी स्वराज्यासाठी योगदान दिलेल्या सात वंशज त्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराजे मोहिते, प्रतापराव गुजर यांचे वंशज सयाजीराजे गुजर, बहिर्जी नाईक यांचे वंशज दादासाहेब नाईक, शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद, ज्योत्याजी केसरकर यांचे वंशज सरदार केसरकर तसेच लखुजी जाधव यांचे वंशज राजेंद्र जाधव सरनोबत या सात वंशजांच्या सन्मानाबरोबरच जिजाऊ गौरव पुरस्काराने अनिता सुरेश जाधव यांचाही गौरव केला होता. 

छत्रपतींनी अर्पण केलेली कवड्याची माळ पाहता येणार 
राजमाता जिजाऊ जयंती व जिजाऊ गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंहगडच्या विजयानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर आपल्या स्वतःच्या गळ्यातील आई भवानीचा आशीर्वाद असणारी समुद्र कवड्याची माळ स्वहस्ते अर्पण केली होती. अशा या पावन झालेल्या कवड्याच्या माळेच्या दुर्मिळ दर्शनाची संधी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT