पश्चिम महाराष्ट्र

गाव भंडाऱ्याने जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेची सांगता

सकाळवृत्तसेवा

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलं.. श्री यमाईदेवी, चोपदाईदेवी, बद्रिकेदार, महादेव , नंदी काळभैरवाच्या नावानं चांगभलंच्या गजरात श्रीक्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथे गाव भंडाऱ्याने बुधवारी चैत्र यात्रेची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळपासूनच मंदिरात भाविकांच्या दोन पदरी रांगेतून दर्शन घेतले. चांगभलच्या गजराने मंदिर परिसर दणाणून गेला.

भाविकांनी मंदिरातील शिखर व सासनकाठी यांच्यावर भव्य अशी गुलाल खोबऱ्यांची उधळण केली. चैत्र यात्रेची सांगता असल्याने पहाटे चारला मंदिरात घंटानाद झाला. त्यानंतर मंदिरातील विविध धार्मिक कार्यास सुरुवात झाली .काकड आरती, मुखमार्जन तसेच सकाळी अभिषेक सोहळा झाला. मंगलपाठ झाले तसेच केदार सहस्त्रनाम केदार महिमा, केदार कवच या विधींचे पठण झाले. त्यानंतर जोतिबा देवाची चतुर्भुज रूपात सालंकृत महापूजा दहा गावकऱ्यांनी बांधली.

सकाळी उंट, घोडा या मानाच्या प्राण्याच्या समवेत धुपारतीचा भव्य दिव्य असा सोहळा झाला. दुपारी महानैवेद्याची शोभायात्रा श्री मुळमाया यमाई मंदिराकडे सवाद्य मिरवणुकीने गेली.

यावेळी सरपंच राधा बुणे, माजी सरपंच शिवाजीराव सांगळे, दहा गावकर, देवस्थानचे अधिक्षक महादेव दिंडे उपस्थित होते. मुख्य पुजारी यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपास प्रारंभ झाला. यावेळी महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. जोतिबा डोंगरावरील  सर्व तरुण मंडळाच्या सासनकाठ्या गुढीपाडव्या दिवशी मंदिरात उभ्या केल्या होत्या. या लहान-मोठ्या चाळीस सासनकाठयांची आज  गावभंडाऱ्या निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मुख्य मंदिरातून यमाई मंदिराकडे गेली .हालगी, पिपाणी , झांज पथक या वाद्यांच्या तालावर या सर्व सासनकाठया नाचविण्यात आल्या. या मिरवणुका पाहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.  

सरता रविवार दोन जूनला

जोतिबा डोंगरावर सात जूनपूर्वी येणारा रविवार हा सरता रविवार म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या दिवशी संपूर्ण गाव पालखी सोहळ्यास हजर असते. त्यानंतर चार महिने हा पालखी सोहळा पूर्णपणे बंद होतो. यंदा दोन जून रोजी हा सोहळा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT