Jubin Jimmy winner of online chess tournament
Jubin Jimmy winner of online chess tournament 
पश्चिम महाराष्ट्र

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत जुबीन जिम्मी विजेता 

घनशाम नवाथे

सांगली : पुरोहित चेस अकॅडमी सांगली आणि चेसनट ऍकॅडमी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारताचा फिडे मास्टर जुबीन जिम्मी याने विजेतेपद पटकावले. 

तसेच अरेना आंतरराष्ट्रीय मास्टर शार्दूल तपासे यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली होती. या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारतासह कजाकीस्तान, अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, अर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यांसह अनेक देशातील ग्रॅंडमास्टर्स, आंतरराष्ट्रीय मास्टर्स, फिडे मास्टर्स सहभागी झाले होते. 

भारताचा फिडे मास्टर जुबीन जिम्मी याने 95 गुणांसह विजेतेपद पटकावले. इराणचा मानांकित खेळाडू रेझा महद्वी हा 88 गुणांसह उपविजेता ठरला. भारताचा ग्रॅंडमास्टर आर. आर. लक्ष्मण यास 84 गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. 

पश्‍चिम बंगालचा आंतरराष्ट्रीय मास्टर अरण्यक घोष यास 81 गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. रशियाचा फिडे मास्टर टाटरिनोव्ह दिमित्री यास 72 गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले. बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली. तांत्रिक पंच म्हणून सारंग पुरोहित, दीपक वायचळ आणि चंद्रशेखर कोरवी यांनी काम पाहिले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT