Jyotiba Chaitra Yatra finally canceled kolhapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग - दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा अखेर रद्द...

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी रद्द करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्मीयांची बैठक झाली. या वेळी हा सामुदायिक निर्णय घेण्यात आला. ‘मी कोल्हापुरी सुरक्षित, माझे कोल्हापूरही सुरक्षित’ ही मोहीम जिल्ह्यात राबविली जात असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.  

इतिहासात प्रथमच चैत्र यात्रा रद्द 

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दर्शनासह जिल्ह्यातील चर्च, मशिदीत सामूहिक प्रार्थना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अंबाबाई मंदिरातील ठराविक पुजारीच पूजा करतील. इतिहासात प्रथमच चैत्र यात्रा रद्द होण्याचा हा प्रसंग आहे. जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी डोंगरावर दरवर्षी राज्यभरातून आठ ते नऊ लाख भाविक येतात. वर्षातून एकदा चैत्र यात्रेस जोतिबाची पालखी मूळमाया यमाईदेवीच्या भेटीसाठी जाते. तसेच, यात्रेत मानाच्या ९६ सह विविधरंगी ७०० सासनकाठ्या सहभागी होतात. त्यांची दुपारी भव्य मिरवणूकही निघते.

‘मी कोल्हापुरी सुरक्षित, माझे कोल्हापूरही सुरक्षित’ ​

यंदा मात्र सर्व जोतिबा भक्तांना कोरोनाच्या कारणामुळे यात्रेस मुकावे लागणार आहे. गेल्या रविवार (ता. १५)पासून डोंगरावर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिर बंद ठेवले आहे. परिणामी, भाविकांची गर्दी होऊ दिली नाही. येणारे भाविक मुख दर्शन व शिखर दर्शन घेऊनच माघारी फिरले. दरम्यान, आज दुपारी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी यांनी जोतिबा ग्रामस्थ, पुजारी, दहागावकर यांची यात्रेसंदर्भात प्राथमिक बैठक घेतली. त्या बैठकीत कोरोनामुळे होणारे धोके सांगितले.

दुपारी जोतिबाचे गावकर प्रतिनिधी प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर यात्रेसंदर्भात पुन्हा चर्चा केली आणि त्यात चैत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, कोल्हापूर चर्च कौन्सिलचे सॅमसन समुद्रे, डी. बी. समुद्रे, सेंट झेंवियर्स मौलाना सय्यद, मुल्सिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल समितीचे वसीम बशीर चाबुकस्वार, जाफर सय्यद, हजर समितीचे इकबाल देसाई, माजी नगरसेवक आदिल फरास उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT