The Kanhor Pathar Water Plan does not have water 
पश्चिम महाराष्ट्र

कान्हूर पठारसह 16 गावे पाणीयोजना बंद, लॉकडाऊनमध्ये पाण्याला जायचं कुठं

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : मांडओहळ धरणातील कान्हूर पठारसह 16 गावे पाणीयोजनेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही योजना बंद असल्याने या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यातील कान्हूर पठारसह अन्य ठिकाणच्या ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे टॅंकरचे प्रस्ताव दाखल केले आहेत. 

धरणावरून कान्हूर पठारसह पिंपळगाव रोठे, पुणेवाडी, गारगुंडी, पिंपळगाव तुर्क, भोंद्रे यांसह अन्य गावांची पाणीपुरवठा योजना आहे. या गावांना उन्हाळा सुरू झाल्यानंतरच या योजनेची गरज दर वर्षी भासते. या योजनेतील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या कान्हूर पठारला तर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

वातील पाण्याचे स्रोत आटल्याने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ही योजना बंद असल्याने या गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. योजना सुरू झाली तरी दुरुस्तीचा खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार यांसह अन्य प्रश्न उपस्थित होतात. 

सौरऊर्जा प्रकल्प रेंगाळला 
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत, जिल्ह्यातील ज्या पाणीयोजना वीजबिलांच्या थकबाकीमुळे बंद आहेत, त्यांकरिता सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून वीजबिलाचा प्रश्न कायमचा मिटवणार असल्याचे सांगितले होते. त्या आश्वासनाचे काय 
झाले, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. 
- गोकुळ काकडे, सरपंच, कान्हूर पठार 

अन्यथा रस्त्यावर येऊ 
गावातील पाण्याचे स्रोत अटल्याने टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. टॅंकरचे प्रस्ताव दाखल केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आमचे प्रस्ताव तत्काळ मंजूर करा, अन्यथा ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरू. 
- गणेश शेळके, सभापती, पंचायत समिती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT