budhajirao mulik
budhajirao mulik 
पश्चिम महाराष्ट्र

यापुढे शेती करणाऱ्यांचे दिवस येणार - बुधाजीराव मुळीक

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - कृषी प्रदर्शनातुन प्रेरणा घेवुन ज्या शेतकऱ्यांनी शेती केली त्यांना याच प्रदर्शनात पुरस्कार देवुन गौरवण्यात येते, ही प्रदर्शनाची यशस्वीता आहे असे गौरवोदगार शेतीतज्ञ डाॅ. बुधाजीराव मुळीक यांनी आज (बुधवार) येथे काढले. शेतीत यापुढे रोबोटचे तंत्रज्ञान येणार आहे. त्यामुळे प्रदर्शनात कृषी यांत्रीकीकरणावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागेल असाही सल्ला यावेळी त्यांनी संयोजकांना दिला. 

यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात आज शंकरराव खोत (वाजेवाडी), सचिन सांगळे (कुरवली बुद्रुक ता. फलटण) निवास गरुड (येणके) यांना यशवंतराव चव्हाण शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, कृषी सहसंचालक महावीर जंगटे, कृषी विकास अधिकारी डाॅ. सी.जी.बागल, वसंतराव जगदाळे, आप्पासाहेब गरुड,  महादेव देसाई, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, गणपतराव हुलवान, उपसभापती रमेश देशमुख, बाजार समितीचे सभापती अमृतराव पवार, उपसभापती आत्माराम जाधव, खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, कोयना संघाचे अध्यक्ष मारुती यादव,  कोयना बॅंकेचे अध्यक्ष रोहीत पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विनोद पवार उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, कऱ्हाडची बाजार समिती एवढ्या मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन भरवते ही मोठी गोष्ट आहे. शेतीमध्ये जास्त फायदा मिळत नाही. मात्र आहे ती शेती विकु नका. यापुढे शेती करणाऱ्यांचे दिवस येणार आहेत. सध्या शेतीपुढे मजुरांचा मोठा प्रश्न आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने कृषी यांत्रीकीकरणाचे जास्त भर देणे आवश्यक आहे. प्रदर्शनातुन अशा यांत्रीकीकरणातील बदलांची माहिती द्यावी. यापुढे शेतीत रोबोटचे तंत्रज्ञान येणार आहे. त्याची माहिती कऱ्हाडच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडुन त्यांची शेती करण्याचे कौशल्य सोप होईल. शेतीचे पुर्ण कर्ज मुक्त करा, शेती मालासाठी उत्पादन खर्चाचा कायदा करा, शेकऱ्याला बायकोसह 60 वर्षानंतर वेतन द्या आणि नैसर्गिक संकटासाठी इर्माचा कायदा लागु करा या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी शेतकऱ्याने जागे झाले पाहिजे.

कृषी सहसंचालक जंगटे म्हणाले, विलासराव उंडाळकरांच्या दुरदृष्टीतुन उतरेलेला महायज्ञ म्हणजे कऱ्हाडचे कृषी प्रदर्शन आहे.  कऱ्हाडच्या प्रदर्शनाचा राज्यभर लौकीक आहे. कोणतीही बाजार समिती कृषी प्रदर्शन भरवत नाही. प्रदर्शनात शेतकऱ्यांनी औजारांवर भर देण्यात आला आहे. त्याची सध्या गरज आहे. यापुढे प्रदर्शऩात कृषी यांत्रीकीकरणावर भर देण्यात येईल. कृषी विकास अधिकारी श्री. बागल म्हणाले, प्रदर्शनातील तंत्रज्ञान शेतावर वापरुन त्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दिला जातो हे प्रदर्शनाचे यश आहे. प्रदर्शनास दरवर्षी मिळणारा प्रतिसाद हा वाढत आहे. त्याला शेतीतील बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची मिळणारी माहिती कारणीभुत आहे. प्रदर्शनात आंतरमशागतीच्या औजांची होते. पुरस्काराबद्दल श्री. खोत यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी आजपर्यंत मिळालेल्या पुरस्कारापेक्षाही मोठा आहे. त्यांच्या नावाने बाजार समितीने दिलेला पुरस्कार सार्थ ठरवण्यासाठी यापुढेही तनमनधन आर्पुण शेतकऱ्यांची शेती सुधारली पाहिजे यासाठी प्रयत्न करेन असे सांगितले.  महादेव देसाई यांनी प्रास्ताविक केले. अशोकराव पाटील-पोतलेकर यांनी सुत्रसंचालन केले.

शेतकऱ्यांचाही सन्मान 

यशवंतराव चव्हाण शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने उत्तेजनार्थ म्हणुन संजय जोतीराम थोरात (मलकापूर, ता. कराड), अधिकराव माने (मानेगाव, ता. पाटण), चांगदेव विष्णू मोरे (सासुर्वे, ता. कोरेगाव), दिलीप अर्जुन दरेकर (सोमर्डी, ता. जावली), गोपाल यशवंत गोरे (आंधळी, ता. माण), कारभारी मारुती खाडे (झाशी, ता. माण), प्रविण रामचंद्र काटे (आवर्डे, ता. पाटण) आनंदराव गणपती शिंदे (देगाव, ता.जि. सातारा) यांचा सन्मान करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT