Bharat Sasane Sakal
पश्चिम महाराष्ट्र

कारदगा संमेलनातून मराठी जागविण्याचे कार्य - भारत सासणे

ज्या-त्या प्रांतात, राज्यातील समस्यांचे स्वरुप वेगवेगळे असते. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील समस्याही वेगळ्या आहेत

अमोल नागराळे, तानाजी बिरनाळे

कारदगा : ज्या-त्या प्रांतात, राज्यातील समस्यांचे स्वरुप वेगवेगळे असते. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील समस्याही वेगळ्या आहेत. मातृभाषा की राज्यभाषा स्विकारायची? असाही संभ्रम व कोंडी असल्यासारखी येथे स्थिती आहे. प्रतिकूल परिस्थितीत अशा कोंडीवर मात करीत कारदगा येथील साहित्य विकास मंडळाने ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सीमाभागात मराठी जिवंत ठेवण्याचे आणि मराठी जागविण्याचे कार्य सुरु ठेवल्याचे गौरवोदगार ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी काढले. रविवारी कारदगा येथे आय़ोजित रौप्यमहोत्सवी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती प्रतिमा पूजनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. ग्राम पंचायत अध्यक्ष राजू खिचडे यांनी स्वागत केले. साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर भारत सासणे म्हणाले, लोकवर्गणीतून ग्रामीण भागात पंचवीस वर्षे साहित्य संमेलन भरविणे सोपे नाही. साहित्य संमेलनाचे हे कार्य कर्नाटकसह महाराष्ट्राने दखल घेण्यासारखे आहे. कारण साहित्य विकास मंडळाने संमेलनातून मराठी भाषेचा वर्षानुवर्षे जागर चालविला आहे. मराठी भाषा सर्वत्र बोलली जाते, मराठी माणूस देश-विदेशात असून तो मराठीपण जपतो आहे. कृत्रीम भेदापलीकडे माणसाला जोडण्याचे कार्य भाषा करीत असते. मनुष्य जीवन व्यवस्थेवर पुण्य आणि पाप सत्ता अशा दोन सत्ता विचार, आचारासाठी प्रभावीत करतात. या सत्ता वैचारिक जीवनाचा विकास करतात. हल्ली राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. राजकीय स्तर उंचावण्यासाठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून राजकीय नेत्यांना तरणोपाय शोधला पाहिजे. कारण साहित्य संमेलनात सत्य बोलावे लागते.

शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, सीमाभागात भाषाभेद नाही. येथे सर्व भाषेचे लोक सौहार्दतेने नांदतात. पंचवीस वर्षे निरंतर सुरु असणारे साहित्य संमेलन कौतुकास्पद आहे. साहित्याचा प्रचार, प्रसारासाठी आपण भवन निर्मितीला लागणारा निधी देण्यास कटीबध्द आहे. पण स्थानिक ग्राम पंचायतीने त्वरीत जागा द्यावी. जागेचा उतारा मिळाला तर त्याचदिवशी २५ लाख निधी आपण देऊ. याशिवाय लोकवर्गणीतून निधी उपलब्ध करावा. निधी कमी पडल्यास पुन्हा आपण देऊ.

बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील यांनी साहित्य विकास मंडळाच्या उपक्रमासाठी अरिहंत समूह नेहमी पाठीशी राहील असे सांगितले. युवराज छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर), डाॅ. इशरद पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले.

संमेलनास ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, डाॅ. सुनीलकुमार लवटे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, दत्त शुगरचे उपाध्यक्ष अरुण देसाई, संजय काशीद, अण्णासाहेब हावले, बाबासाहेब नोरजे, दादासाहेब नरगट्टे, सुनीता कोगले, अरविंद खराडे, अभिनंदन मुराबट्टे, प्रदीप जाधव यांच्यासह साहित्य विकास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, साहित्य रसिक उपस्थित होते. सुचित बुडके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कल्पना रायजाधव, विनोद परीट यांनी सूत्रसंचालन केले.

साहित्यासह सत्याचा जागर

संमेलनाध्यक्ष भारत सासणे म्हणाले, साहित्यासह सत्याचा जागर अशा संमेलनात होत असतो. सत्याचे कथन नेहमी ऐकले पाहिजे. कारण सत्याच्या आवाजाला धार असते. त्यासाठी विवेकाचा कान असावा लागतो, विवेकाचा कान साहित्य संमेलनातून निर्माण होतो. यामुळे समाज प्रगल्भ बनतो. विवेकाचा कान बनल्यास चांगला वाचक निर्माण होतो, चिंतन करणारे लोक घडतात. सत्यापासून दूर जाण्याचा मार्ग थांबविला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT