Karjat-Jamkhed's voice in the Assembly 
पश्चिम महाराष्ट्र

विधानसभेत कर्जत-जामखेडचा "आवाज'

नीलेश दिवटे

कर्जत : दशकानुदशके प्रलंबित असलेल्या कर्जत-जामखेड तालुक्‍यांतील प्रश्‍नांना थेट विधानसभेत वाचा फुटली. पिचलेल्या जनतेचा "आवाज' आमदार रोहित पवार यांनी नागपूर अधिवेशनात उठवला. पीकविमा, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, कर्जमाफी, प्रकल्पग्रस्त, वाळूउपसा, चाराछावण्यांचे अनुदान, रस्ते, जामखेडचा पाणीपुरवठा, तसेच गोदड महाराज मंदिर परिसराचा विकास, अशा विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. 

आमदार रोहित पवार यांनी फळबाग विमा योजनेतून लिंबू, पेरू आणि द्राक्षे आदी पिकांना वगळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने, कोणतेही पीक वगळू नये. विमा कंपनी आणि प्रशासनातील तांत्रिक अडचणींमुळे 2017-18च्या पीकविम्याची प्रलंबित रक्कम, तसेच अवकाळी पावसामुळे भरपाई द्यावी. कुकडी, उजनी आणि सीना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी वर्ग-2च्या असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या जमिनींचे वर्ग-1मध्ये रूपांतर करण्याबाबत आवाज उठविला. 

कर्जत तालुक्‍यातील सीना, भीमा नदीपात्रांतून होणाऱ्या अवैध वाळूउपशाला आळा घालावा, तसेच नियमानुसार चालविलेल्या चाराछावण्यांचे प्रलंबित अनुदान द्यावे. नियमभंग केलेल्या छावण्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेले शेतकरी रक्कम भरूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यांना तातडीने पैसे देण्याची मागणी त्यांनी केली. 
तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्जतच्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे. 

कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्‍यांच्या पंचायत समित्यांच्या इमारतींची पुनर्बांधणी झाली पाहिजे. जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला तातडीने मंजुरी देण्याची मागणीही पवार यांनी केली. मतदारसंघातील अनेक गावांच्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. ग्रामविकास विभागाकडून याकडे तातडीने लक्ष द्यावे. कर्जतचे ग्रामदैवत असलेले संत श्री गोदड महाराज मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली. 

सोशल मीडियातही लक्षवेधी 
दोन्ही तालुक्‍यांतील प्रश्‍न प्रथमच अधिवेशनात मांडले गेले. सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेत पोचल्याने कर्जत-जामखेडमधील जनतेत समाधानाचे वातावरण आहे. मतदारसंघासह राज्याच्याही विकासाचा आढावा आमदार पवार यांनी घेतला. त्याचीही चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. 

प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न 
राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता, यातील सर्वच प्रश्न लगेच चुटकीसरशी सुटतील असे नाही; परंतु यांपैकी बहुतांश प्रश्न कसे सुटतील, असा माझा प्रयत्न राहणार आहे. महाआघाडीचे सरकार हे आपल्या सर्वांचेच सरकार असल्यामुळे सगळे प्रश्न सोडविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. 
- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Latest Marathi News Live Update : भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांकडून आज चालवल्या जाणाऱ्या एकूण २८१ उड्डाणे रद्द

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

Pune Crime : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल ३ कोटी ७८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT