CM Siddaramaiah on 25th visit to Sangli  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : भाजपला चितपट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा ठरणार निर्णायक; काँग्रेस करणार भव्य शक्तिप्रदर्शन

काँग्रेस लोकसभा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शनही करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Karnataka CM Siddaramaiah) यांचा रविवारी (ता. २५) धनगर समाजातर्फे (Dhangar Community) येथे नागरी सत्कार केला जाणार आहे. यानिमित्त येथील नेमिनाथनगर कल्पद्रुम क्रीडांगणावर सकाळी १० वाजता काँग्रेस व शेतकऱ्यांचा मेळावा होणार आहे, अशी माहिती आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) पत्रकार परिषदेत दिली.

यानिमित्ताने काँग्रेस लोकसभा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शनही करणार आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागासाठी कर्नाटकातून पाणी देण्यासह विविध मुद्दे चर्चेला येणार आहेत. त्याअर्थाने हा मेळावा महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास विश्वजित यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृवीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांनी व्यक्त केला.

विश्वजित कदम म्हणाले, "देशात महागाई, बेरोजगारीसह असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याला कर्नाटकच्या जनतेने उत्तर देत काँग्रेसचे सरकार आणले आहे. या सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा महाराष्ट्रात पहिला सत्कार सांगलीत होतोय. त्याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विधानसभेतील पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील.

देशात वातावरण बदलत असताना सर्वत्रच काँग्रेस एकजुटीने पुढे जात आहे. आमदार विक्रम सावंत म्हणाले, "जत पूर्व भागाला कर्नाटकातून पाणी यावे, त्याबाबत करार व्हावा, यासाठी अनेकदा प्रयत्न झाले आहेत. आता हा विषय निर्णायक टप्प्यावर असून, त्यासाठी सिद्धरामय्या यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. उन्हाळ्यात द्यायचे व पावसाळ्यात जतला पाणी घ्यायचे, हाच शाश्वत आणि प्रभावी उपाय आहे.

सांगलीच्या दोन्ही जागा काँग्रेसच्याच

सांगली लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही जागा काँग्रेसच्या आहेत. आणि राहतील, असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीने कितीही दावा केला तरी सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. २०१९ ला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करूनही जे घडले, ते होऊन गेले. आता तसे होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT