डीसी वेंकटेशकुमार Sakal
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकात येण्यासाठी आरटीपीसीआरची सक्ती

डीसी वेंकटेशकुमार; दोन डोसबाबतचा आदेश घेतला मागे

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कर्नाटकात येणाऱ्यांसाठी आता आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी कोरोनाचे दोन्ही प्रतिबंध डोस किंवा ७२ तासांतील आरटीपीसीआर (रिव्हअर्स ट्रान्सक्रिप्‍शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन) चाचणी अहवाल असल्यास प्रवेश मिळेल, असे जिल्हाधिकारी आर. वेंकटेश कुमार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. परंतु, मंगळवारी याबाबतचा सुधारीत आदेश उपलब्ध झाल्याचे त्यांनी दिली. त्यानुसार आता कर्नाटकात येण्यासाठी आरटीपीआर चाचणी अहवाल अंतिम असेल, असे दै. ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या नवीन विषाणूबाबत प्रशासकीय पातळीवर खबरदारी म्हणून चेकपोस्टवर बंदोबस्त वाढविला आहे. तसेच केरळ वा महाराष्ट्र या राज्यातून येणाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी वेंकटेशकुमार यांनी आरटीपीसीआर वा कोरोना प्रतिबंधचे दोन डोस घेतलेल्यांना कर्नाटकात प्रवेश मिळेल, असे स्पष्ट केले होते. पण, मंगळवारी या संदर्भामध्ये सुधारीत आदेश उपलब्ध झाल्याचे सांगितले. त्यात आरपीसीआर चाचणीचा अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. आरटीपीसीआर चाचणी अहवाल ७२ तासांपूर्वीचा नसावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटकात येणाऱ्यांसाठी दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी अहवालाची सक्ती करण्यात आली होती. त्याप्रमाणे मागील दोन दिवसांपासून प्रवाशांची ये जा सुरु होती. पण, काही नाक्यावर वाहनधारकांची अडवणूक सुरु होती. प्रवाशांना अडविण्यात येत होते. डोसऐवजी आरटीपीसीआरची विचारणा केली जात होती. त्यातून मतभेद, वादावादी वणि शाब्दीक चकमकही उडाली. या दरम्यान मंगळवारी सुधारीत आदेश जिल्हाधिकारी वेंकटेश कुमार यांनी बजाविला आहे.

त्यात कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना कर्नाटकात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय मागे घेतल्याचे कळविले असून, केवळ आरटीपीसीआर अहवाल उपलब्ध असलेल्यांना प्रवेश मिळेल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे कर्नाटकामध्ये येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची सक्ती परत लागू केली आहे. जिल्ह्यात कोविडच्या पार्श्‍वभूमीवर २३ चेकपोस्ट असून, कागवाड, शिनोळी आणि कोगनोळीत बंदोबस्त वाढविला आहे.

‘‘कोविडचे दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांना कर्नाटकामध्ये प्रवेश होता. पण, याबाबत सुधारीत आदेश मंगळवारी बजाविण्यात आला असून, त्यात केवळ आरटीपीसीआर चाचणी अहवाल असलेल्यांना प्रवेश देण्याचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे. विनाचाचणी अहवाल प्रवेश न देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.’’

- आर. वेंकटेश कुमार, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : पुण्यातील विधानभवन ध्वजारोहण सोहळ्यात आसन व्यवस्थेवरून नीलम गोरे नाराज

SCROLL FOR NEXT