The Karnataka government is doing injustice to the Marathi people in the Karnataka border marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्राचे पाणी चालते, मग साहित्यिक, नेते का नाही ?

राजेंद्र हजारे

निपाणी (बेळगाव) - भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांवर कर्नाटक शासन अन्याय करीत आहे. तरीही सनदशीर मार्गाने मराठी बांधव लढा देत आहेत. आता कर्नाटक सरकारने हुतात्मा दिन पाळण्यासह साहित्य संमेलन भरविण्यावर गदा आणली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून जूनपर्यंत महाराष्ट्राचे पाणी चालते, मग मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिक आणि नेतेमंडळी का नकोत, असा सवाल मराठी भाषिकांतून विचारला जात आहे. शिवाय, मराठी साहित्य संमेलनात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निपाणी सीमाभागातून कर्नाटक प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्राची कर्नाटकाला मिळते साथ

काळम्मावाडी करारानुसार अनेक वर्षांपासून कर्नाटक सीमाभागातील वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांना फेब्रुवारीपासून जूनअखेर कर्नाटकाच्या वाट्याचे पाणी सोडले जाते. तरीही पाण्याची कमतरता भासल्यास मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनातर्फे त्या नद्यांना पाणी सोडून सीमाभागातील गावांना दिलासा मिळतो. त्या पाण्यावरच शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उन्हाळ्यात निकालात निघतो. कर्नाटक सीमाभागात मराठी माध्यमात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना महाराष्ट्र हद्दीतील अनेक शिक्षण संस्था ज्ञानदान करतात. त्याचप्रमाणे सोयी-सुविधा सुविधाही दिल्या जात आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रशिक्षणासह नोकरीमध्येही सीमाभागातील लोकांना आरक्षण दिले जाते. त्यामुळे आज कित्येकांना सरकारी नोकरी मिळाली आहे. आता सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात असताना कर्नाटकाची अरेरावी वाढली आहे.
निपाणीत आतापर्यंत मराठी साहित्य संमेलने भरली आहेत. कायदेशीर रित्या परवानगी मागूनही संमेलनासाठी आडकाठी आणून मराठी भाषिकांची मुस्कटदाबी होत आहे. केवळ निपाणी नव्हे तर बेळगाव परिसरात भरणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाही कर्नाटक शासनाने जोरदार विरोध केला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनाही रोखून धरले. महाराष्ट्रातील नेतेमंडळीनाही संमेलनास येण्यास मज्जाव केला. कर्नाटकात शिक्षण घेऊन अनेक जण महाराष्ट्रात नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. सीमाभागातल्या मराठी बांधवांसाठी स्वर्गीय पद्मभूषण देवचंद शाह यांनीही जनता शिक्षण मंडळाची स्थापना करून मराठी भाषिक विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे. केवळ ज्ञानदान न करता विविध शिष्यवृत्त्याही दिल्या आहेत. अशा सर्व बाबी असताना केवळ मराठी साहित्य संमेलनाला आडकाठी आणि हे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया सीमाभागातून व्यक्त होत आहेत. 

आताच हा अट्टहास का?

कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून निपाणीची ओळख आहे. रोज नोकरी, व्यवसाय, कामधंदा, शिक्षणाच्या निमित्ताने शेकडो सीमावासीय कर्नाटक-महाराष्ट्रात ये-जा करतात. शिवाय, सीमाभागातील अनेक कुटुंबांचे कर्नाटक-महाराष्ट्रात घरोब्याचे संबंध आहेत. दोन्ही राज्यांत विविध साहित्याची देवाण-घेवाणही निरंतरपणे सुरू आहे. त्यात कोठेही बाधा येत नसून, आताच हा अट्टहास का, असा सवाल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

Leopard Terror: 'आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात बिबट्याचा सलग तीन दिवसांचा वावर': परिसरात भीतीचे वातावरण

Solapur Rain update: 'साेलापूर शहरातील रस्त्यावरुन वाहू लागल्या नद्या'; शनिवारी शहरात ३२.६ मिमी पाऊस; तीन दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेलेच

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT