Kartavya Social Group's Plastic Collection Initiative 
पश्चिम महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी पार पाडले 'कर्तव्‍य'

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शालेय मुलांना प्लॅस्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम कळावेत आणि लहान वयातच त्यांना प्लॅस्टिक कचरा निर्मूलनाचा छंद जडावा, यासाठी कर्तव्य सोशल ग्रुप आणि सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी गोळा केलेला प्लॅस्टिक कचरा दर महिन्याच्या दोन तारखेला उचलून त्याचे विघटन करण्यात येत आहे. काल तब्बल 75 किलो प्लॅस्टिक कचरा गोळा झाला. त्याचे विघटनही करण्यात आले. 

या शाळा सहभागी...

कर्तव्य सोशल ग्रुप, सागर मित्र अभियान या संस्थेमार्फत सातारा शहर परिसरातील शाळांना प्लॅस्टिक मुक्तीसाठी आवाहन केले होते. त्यासाठी "कर्तव्य'च्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. शाहूपुरी माध्यमिक विद्यालय, अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय, सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, लोकमंगल हायस्कूल नागेवाडी, ब्लॉसम स्कूल आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत दूध पिशवी, तेल पिशवी, पाण्याची बाटली, प्लॅस्टिक पाऊच, किराणा मालासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, चॉकलेट रॅपर, तुटक्‍या वॉटर बॅगा, प्लॅस्टिक चप्पल, प्लॅस्टिक डबे, कंपास, फोल्डर, पट्टी यासह प्लॅस्टिकपासून बनवलेल्या तुटक्‍या, निरुपयोगी वस्तू असा सर्व प्रकारचा सुमारे 75 किलो कचरा गोळा केला होता. 

तुम्‍हीही व्‍हा सहभागी
शाळांत गोळा झालेला कचरा गुरुवारी "कर्तव्य' ग्रुपने वाहनात भरून विघटनासाठी नेला. यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी कचरा निर्मूलन आणि प्लॅस्टिक मुक्तीची शपथ घेऊन "माझे घर, माझी शाळा कचरामुक्त' करण्याचा निधार केला. उचललेल्या या कचऱ्याचे विघटनही सागर मित्र सेवाभावी संस्थेमार्फत केले जात आहे. या उपक्रमात शहरातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे आणि आपल्या शाळेचा परिसर आणि पर्यायाने आपले सातारा शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याठी योगदान द्यावे. तसेच नागरिकांनीही प्लॅस्टिक कचरा इतरत्र न टाकता विद्यार्थ्यांकडे द्यावा अथवा कर्तव्य ग्रुपशी संपर्क साधावा. उपक्रमात सहभागी होण्यासाठी सोहम कुलकर्णी (8412979058), सुहास वहाळकर (9420772773) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची ग्वाही, पण ३३ पैकी ५ जिल्ह्यांचेच पंचनामा अहवाल अंतिम; शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज, पण...

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

आजचे राशिभविष्य - 14 ऑक्टोबर 2025

पचन न झाल्यावर शरीराची प्रतिक्रिया

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT