पश्चिम महाराष्ट्र

अल्पावधीतच पाेलिस पडले 'या'च्या प्रेमात

सकाळ वृत्तसेवा

खंडाळा (जि. सातारा) : येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हणमंतराव गायकवाड व इतर पोलीस मंगळवारी (ता. 24) राञगस्त घालत असताना पावणे बारा वाजण्याच्या सुमारास खंडाळा ते कण्हेरी रस्त्यावरील असवली येथील खिंडीमध्ये भेकर रस्त्याच्या मध्यभागी आढळुन आले.

हेही वाचा -  कऱ्हाड : महाविद्यालयीन मुलींच्या गटात राडा

यावेळी भेकरास त्यांनी पकडले. त्याच्या पाठीवरुन हात फिरविला. त्यानंतर त्यास पोलिस ठाणे येथे घेवून गेेले. पाेलिसांनी वनक्षेत्रपाल (प्रादेशिक ) सांगवी ( ता.खंडाळा) येथील वनरक्षक प्रकाश शिंदे व सुनील राऊत यांना भेकराबाबत कळविले. 

शिंदे आणि राऊत यांनी भेकरास आपल्या ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात पाेलिसांना भेकरचा लळा लागला हाेता. त्याची ते मुलाप्रमाणे काळजी घेत हाेते. त्याला वनरक्षकांच्या ताब्यात देताना त्यांची मने हेलावली.

जरुर वाचा - टॅक्‍सी चालकाचा प्रामाणिकपणा, 13 लाख केले परत

यावेळी पोलीस नाईक गिरीष भोईटे, पोळ, धुमाळ, वीर व इतर पोलिस ही उपस्थित होते. एक महिन्याच्या भेकरास जीवदान दिल्याने वनप्रेमींकडून खंडाळा पोलिसांचे कौतुक हाेत आहे.

दरम्यान मागील पंधरवड्यात अजनुज परिसरात बिबट्या दिसल्याचे पाऊलखुणा आढळुन आले. यानंतर कण्हेरी येथेही बिबट्या नजरेस पडल्याचे सांगण्यात आले. आता भेकराचे तर प्रत्यक्ष दर्शनही याच भागात झाल्याने वन्यप्राणीचा वावर खंडाळ्याच्या पश्चिमेस वाढत असल्याचे जाणवत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्रात 42.63 टक्के मतदानाची नोंद

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT