kharsundi sakal
पश्चिम महाराष्ट्र

Tembhu Water Scheme: ‘टेंभू’ने केली कायमच्या दुष्काळावर मात..

Farmers have been the most benefited: आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आल्याने कायमस्वरुपी दुष्काळाचा कलंक पुसला गेला.

सकाळ वृत्तसेवा

Kharsundi : आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आल्याने कायमस्वरुपी दुष्काळाचा कलंक पुसला गेला. मुख्य कालव्याच्या गेटमधून ओढापात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा सर्वाधिक उपयोग शेतकऱ्यांना झाला आहे. सध्या कल नगदी पिकाकडे आहे.

तालुक्यात प्रथम सन 2024 ला टेंभू योजनेचे पाणी धावडवाडी येथे स्थानिक ओढापात्रात सोडण्यात आले. यापुढे मुख्य कालव्याची कामे अपूर्ण होती. इथपर्यंत पाणी सोडण्यासाठी आटपाडी तालुक्यासह सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मोठा रेटा लावण्यात आला होता. यासाठी पाणी संघर्ष चळवळ व श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मोठे काम करण्यात आले. त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने स्थानिक ओढापात्रात पाणी सोडून आटपाडी तालुक्यातून सांगोला तालुक्यातील बुध्याळ तलावात सोडण्यात आले. तदनंतर राहिलेली मुख्य कालव्याची कामे झटपट करून तालुक्यातील सर्वच कालवा पूर्ण झाला. आटपाडी तालुक्यात मुख्य कालव्यावर स्थानिक ओढापात्रात सोडण्यात येण्यासाठी 18 गेट बसवण्यात आले आहे.

तालुक्यात पश्चिम-पूर्व अशी ओढ्या-नाल्याची वाहण्याची दिशा आहे. कालवा पश्चिमेस असल्याने तालुक्यातील सर्वच ओढे नाले पाणी सोडण्यासाठी फायदेशीर ठरले. योजनेचे पाणी गेटमधून स्थानिक ओढापात्रात सोडून या ओढापात्रावर असणारे नालाबांध, पाझर तलाव व साठवण तलाव भरण्यात आले. तालुक्यात 13 साठवण तलाव आहेत. प्रत्येक गावात चार ते पाच असे गावाच्या पाणलोट क्षेत्राच्या दिशेने पाझर तलाव व मोठ्या ओढ्यांना सिमेंट बंधारे आहेत. जांभुळणीसारख्या गावात स्थानिक ओढापात्रावर कोल्हापूर पद्धतीचे केटीवेअर बंधारे आहेत. योजनेच्या पाण्याने भरून घेण्यात येतात. योजनेचे पाणी सोडण्यात आल्यानंतर कधी दोन महिने, तर कधी चार महिने मुख्य कालव्यास राहते. त्यामुळे पाण्याची अडचण शेतकऱ्यांना येत नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुक्यात असणारे बंधारे भरून घेण्यात येतात

योजनेचे पाणी आल्यापासून स्थानिक ओढापात्रांना पाणी वाहते झाले आहे. तालुक्यातील बंधाऱ्यांना पाणी टिकून राहत असल्याने व ओढापात्रांना पाणी राहिल्याने भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात टिकली आहे. त्याचा उपयोग तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना विहिरी व कूपनलिकांना चांगला झाला आहे. पाऊस कमी झाला तरी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत नाही.

सध्या विहीर व कूपनलिका खोदण्यात येतात. त्यांना पाणी लागत नाही, असे होत नाही. त्यामुळे टेंभू योजनेचा सर्वात मोठा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनाही झाला आहे. योजनेच्या पाण्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांनी बागायत क्षेत्र वाढवण्यास सुरुवात केली आहे

नगदी पिकांकडे ओढा वाढला

सध्या तालुक्यात बागायत क्षेत्रामध्ये नगदी उसाचे क्षेत्र 2709 हेक्टर, फळबागा 4812 हेक्टर, भाजीपाला 528, फुले 70 हेक्टर व औषधी वनस्पती 41 हेक्टरमध्ये आहेत. यासह खरीप व रब्बी हंगामात घेण्यात येणारी कडधान्य पिके व फळबागाच्या क्षेत्रामध्ये प्रतिवर्षी वाढ होत शेतकऱ्यांचा ओढा नगदी पिकांकडे वाढला आहे. याशिवाय, तालुक्यात बंदिस्त वितरिकेचा चांगलाच लाभ शेतकऱ्यांना होत आहे. बंदिस्त वितरिकेचे दोन गेट तालुक्यासाठी करण्यात आले आहे. मुख्य खरसुंडीनजीक, तर दुसरे घाणंद गावच्या पश्चिमेस आहे. या दोन वितरिकांचा वितरण विस्तार तालुक्याच्या चढ-उतारानुसार करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT