पश्चिम महाराष्ट्र

फळांच्या "राजा'चे आगमन यंदा उशिरा 

रमेश दास

वाळूज (ता. मोहोळ, जि. सोलापूर)  : आपल्या अवीट गोडीने सर्वांना वेड लावणाऱ्या केशर, हापूस आंब्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध चवींच्या देशी आंब्याचा हंगाम हवामानातील बदलाने लांबला आहे. जानेवारी उलटत आला तरी अद्यापही आंब्याच्या झाडांना तौर (मोहोर) मोहरलेला नाही. त्यामुळे बाजारपेठेत फळांच्या "राजाचे' म्हणजेच आंब्याचे आगमन उशिराने होणार आहे. 

गेल्या पावसाळ्यात उशिरा सुरू झालेला पाऊस नंतर मात्र चांगलाच लांबला. परिणामी थंडीचेही उशिरानेच आगमन झाले. अद्यापही हुडहुडी भरायची थंडी सोलापूर जिल्ह्यात अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आंब्याचा हंगाम लांबत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, वैराग, पांगरी, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, करमाळा, पंढरपूर, माळशिरस तसेच शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, कळंब, भूम, उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्‍यात आजही काही प्रमाणावर देशी आंब्याच्या आमराया तग धरून आहेत. 

देशी आंब्यामध्ये अनेक प्रकारचे जसे की, काळू, तुप्या, खोबऱ्या, शेप्या, गोटी, केसऱ्या, केळ्या यासह विविध आकारावरून, चवीवरून त्यांची त्या त्या ठिकाणची स्थानिक नावे वेगवेगळी आहेत. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी केशर, हापूस या सुधारीत वाण असलेल्या आंब्याच्या बागांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर आंबा लागवड केली आहे. मात्र यंदा बदललेले ऋतूचक्र आणि हवामानामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणीवर जाणार आहे. त्यामुळे आंब्याची चव यंदा उशिराच चाखायला मिळणार आहे. 

झाडांना अद्याप मोहोर नाही 
गेल्या वर्षीच्या भीषण दुष्काळामुळे आंबा उत्पादन देणारी केशर जातीची 14 वर्षांची 35 झाडे, पाच वर्षांची 375 झाडे आणि नवीन लागवड केलेली एक वर्षाची दोन हजार 500 रोपे पाण्याअभावी जळून गेली. त्यातूनही तग धरून राहिलेल्या आंब्यांच्या झाडांना यावर्षी अजूनपर्यंत मोहोर लागलेला नाही. त्यामूळे यंदा आंबा फळांचा हंगाम लांबणार आहे. 
- रत्नमाला पोतदार, सभापती तथा आंबा उत्पादक देगाव, ता. मोहोळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT