know about competition for sheep running  
पश्चिम महाराष्ट्र

अशी असते मेंढरे पळविण्याची आगळीवेगळी स्पर्धा... (व्हिडिओ)

सदाशिव पुकळे

झरे (सांगली) -  झरे येथे दरवर्षी दिपावली पाडव्यानिमित्त मेंढरे पळविण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेपूर्वी दोन दिवस अगोदर मेंढ्यांना धुवून स्वच्छ केले जाते. त्यांना रंगाने रंगविले जाते. 

अशी असते स्पर्धा

मेंढ्या व बकरी पळविण्याच्या स्पर्धा म्हणजे नक्की काय हे अनेकांना ही स्पर्धा पाहिल्याशिवाय समजत नाही. कारण यात वेगळेपण आहे. गावातील मुख्य चौकात सहा ते सात फुटावर एका दोरीला नारळ व नोटा बांधल्या जातात. दोरीच्या खाली जमिनीवर घोंगडी धरली जाते. रस्त्याच्या दोन्ही कडेला नागरिकाचा जमाव असतो. मेंढ्या काही अंतरावरून पळवत आणल्या जातात. त्या नारळ बांधलेल्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच जमिनीवर धरलेली घोंगडी हलवली जाते. यामुळे मेंढरांना उडी मारून पुढे जावे लागते. मेंढरे तसेच बकरे उंच उडी मारण्याचा प्रयत्न करतात. या उडीत मेंढराने जर नारळ बांधलेल्या दोरीला स्पर्श केला तर ते मेंढरू विजयी ठरते. 

गावातील सर्व मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन या स्पर्धेत भाग घेतात. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांचा मानसन्मान केला जातो. संजय महादेव मोटे, पोपट खरजे, पोपट मोटे, समाधान मोटे, दशरथ अणुसे, कुंडलिक मोटे, अर्जुन मोटे, बाळू मोटे, संजय खरजे, सत्यवान खरजे, शंकर खताळ, संजय चव्हाण, शांताराम कांबळे, प्रकाश कारंडे, प्रकाश अणुसे, अंतू मोटे यांच्या मेंढरांनी या स्पर्धेत भाग घेतला. 

स्पर्धेचा निकाल असा 

प्रकाश डोंबळे यांच्या मेंढराने स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. दुसरा क्रमांक रावसाहेब हांडे यांच्या मेंढराने तर अंतू मोटे याच्या मेंढराने तिसरा क्रमांक पटकावला. 

दीपावली पाडव्यानिमित्त गावच्या मुख्य चौकात मेंढरे पळविण्याची स्पर्धा स्पर्धा घेतली जाते. ही परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. तोच वारसा आम्ही जतन करीत आहोत.

- चंद्रकांत पावणे,  सरपंच

दीपावली पाडवा हा मेंढरांचा सण

सध्या मेंढपाळांची संख्या घटली आहे. सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मेंढपाळावर अवलंबून असतो. सध्याच्या वाढत्या महागाईत हे परवडणारे नाही. यामुळे तरूणांनी याकडे पाठ फिरवली आहे. शिक्षण घेऊन शहरात नोकरी करण्याकडेच त्यांचा कल आहे. पण ग्रामीण भागात अद्यापही परंपरा पाळली जाते. बेंदुर जसा बैलाचा सण असतो तसा दीपावली पाडवा हा मेंढरांचा सण मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सिंहगडावर मित्रांसोबत गेलेला तरुण बेपत्ता; हुडी घातलेला संशयित कोण? घातपात की अपघात?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं यूट्यूब पदार्पण; ‘टेम्पल ट्रेलस’ शोमधून महाराष्ट्राचा वारसा उलगडणार

Maharashtra Latest News Live Update : गंगापूर धरणातून विसर्ग कमी, नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती ओसरतेय

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची तब्येत अचानक बिघडली; एच. एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

श्रेयस अय्यरचा पुन्हा भ्रमनिरास! ODI कर्णधारपदाचे केवळ 'गाजर'; BCCI ने स्पष्ट केली भूमिका, इथेही शुभमन गिलला संधी...

SCROLL FOR NEXT