पश्चिम महाराष्ट्र

मसाई पठारावर रंगीबेरंगी रानफुलांची मुक्त उधळण

राजेंद्र दळवी

आपटी -  ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्‍चिमेकडील पौराणिक माहात्म्य असलेल्या महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या मसाई पठारावर रंगीबेरंगी रानफुलांची मुक्त उधळण झाली असून, निसर्गनिर्मित नवरंगांचा उत्सव पाहण्यास हौशी पर्यटकांची पावले मसाई पठाराकडे वळू लागली आहेत.

पाचगणीच्या टेबललॅंडपेक्षाही मोठे असलेल्या नजरेच्या कवेतही न मावणाऱ्या सुमारे ९१३ एकरांवर पसरलेल्या निसर्गनिर्मित विस्तीर्ण अशा मसाई देवीच्या नावाने प्रसिद्धी पावलेल्या मसाई पठाराने हिरवा शालू परिधान केला असून, मसाई पठारावरील डोंगरदऱ्यांमध्ये विविध जातीची, रंगांची, आकाराची छोटी-छोटी रंगीबेरंगी रानफुले फुलली आहेत. 

सध्या मसाई पठारावर रानफुलांचा हंगाम सुरू असून, विविधरंगी फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. हिरव्या गवताच्या गालिच्यावर फुललेली निलवंती (सायनोटीस), सोनकी (सेनिसिओ), केना (कॅमेलीना), कापरू (बिओनिया), रानतेरडा, सीतेची आसवे (युट्रीक्‍यूलेरिया), सफेदगेंद (इरीओकोलाँस), सफेदमुसळी (क्‍लोरोफायटंम), मंजिरी (पोगोस्टीमोन डेक्कननेन्सीस), रानकोथिंबीर, रानहळद, नीलिमा (ॲनिलीमा), जंगलीसुरण (सापकांदा), पेनवा, कंदीलफुल (सिरोपेनिया), दीपकाडी (डीपकॅडी), तेरेसा, यात अतिदुर्मीळ असणाऱ्या देखण्या विविध रंगांमुळे व आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे पटकन दृष्टीस पडणाऱ्या कंदीलफुलांच्या तीन प्रजाती या पठारावर आढळतात; तर अग्निशिका हे नाव सार्थ ठरविणारी कळलावीची पिवळसर लालभडक फुले आणि लहान सूर्यफुलांसारखी दिसणारी सोनकीची गर्दपिवळी फुले; तर काही ठिकाणी पिंडावनस्पतींच्या पांढऱ्या फुलांचे ताटवे मन प्रसन्न करतात. त्याबरोबरच समूहाने वाढणाऱ्या अनेक वनस्पती या पठारावर मुबलक प्रमाणात आढळतात. यात सफेद मुसळी, पिवळ्या फुलांची काळीमुसळी (कुरकीलॅगो), पांढऱ्या फुलांची दीपकाडी, निळीचीराईत आणि आपल्या विचित्र आकाराने सर्वांचे लक्ष वेधणारे भुईआमरी (ग्राउंडऑर्कीड)चे सहा ते सात प्रकार मसाई पठाराच्या जांभ्या खडकावर पाहावयास मिळतात. 

पाणथळ परिसरात सफेद गेंदाच्या सूक्ष्म फुलांना चेंडूसारख्या गोलाकार मंजिरी येतात. यात गोलगेंद, तारागेंद, पानगेंद अशा दहा प्रजाती आढळतात. या जैवविविधतेचा नजारा पाहण्यासाठी कोल्हापूरपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसाई पठाराला पर्यटक आवर्जून भेट देत आहेत.

औषधी गुणधर्म असणाऱ्या फुलांनाही बहर
औषधी गुणधर्म सांगणाऱ्या रानकोथिंबीर, रानहळद, रानआले याबरोबर आकर्षक फुलांनी बहरलेली निळ्या रंगाची भारंगीची झुडपे आढळून येत आहेत. स्मिथीयाच्या फुलांच्या नऊ प्रजातींपैकी चार ते पाच प्रजाती मसाई पठारावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात. स्मिथीयाची फुले पिवळ्या रंगाची असून, मोठ्या पाकळीवरील दोन लालभडक ठिपक्‍यांमुळे या फुलांना मिकीमाऊसची फुले म्हणून ओळखतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT