पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरात गूळ दरात घसरण सुरूच

विकास कांबळे

कोल्हापूर -  जगात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी गुळाला वाढती मागणी असताना महिनाभरातच दर उतरण्यास सुरवात झाली. अवघ्या महिनाभरात गुळाचा भाव प्रतिक्‍विंटल हजार ते दीड हजार रुपयांनी उतरल्याने गूळ उत्पादकांत चिंता आहे. 
गुळाच्या दरातील घसरण अशीच सुरू राहिल्यास गुऱ्हाळे बंद पडण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

कोल्हापुरी गुळाने जागतिक बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण केली. कोल्हापुरी गुळाला अधिक मागणी असते. हे पाहून अनेक राज्यातून कोल्हापूरचे नाव वापरून गुळाची निर्यात व्यापारी करू लागले. साखर कारखानदार ठरवतील, तो दर घ्यायचा आणि शेतकऱ्यांनी शांत बसायचे, असे होते. शिवाय कारखाना देईल, तेव्हा उसाची रक्‍कम घ्यायची अशी परिस्थिती होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी गुऱ्हाळाकडे वळायचा. गुळाचे पैसे देखील शेतकऱ्याला लगेच मिळायचे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक गुऱ्हाळघरे कोल्हापुरात आहेत. असे असले तरी दिवसेंदिवस ही संख्या कमी होत चालली आहे. पूर्वीपेक्षा निम्मी गुऱ्हाळघरे आता राहिली नाहीत. त्याला मनुष्यबळाबरोबरच गुळाचा घसरणारा दर कारणीभूत आहे.

‘‘सध्या गुळाची आवक वाढली आहे. तसेच बाजारातील साखरेचे भाव पडले आहेत. त्याचा परिणाम गुळाच्या दरावर झाला आहे.’’
- कृष्णात पाटील,
सभापती, बाजार समिती

दरम्यानच्या काळात आंदोलनामुळे साखर कारखाने चांगले दर देऊ लागल्याने शेतकरी कारखान्यांना ऊस घालू लागले. मध्यंतरी गुळाची आवक कमी झाल्याने पुन्हा गुळाचे भाव वाढले. साखरेपेक्षा गुळाचा भाव जादा झाल्याने शेतकरी पुन्हा गुऱ्हाळाकडे वळला. मात्र हा दर कायम राहिला नाही. यंदा महिन्यातच गुळाच्या भावात घसरण झाल्याने चिंता व्यक्‍त होत आहे. 

पाडव्याच्या मुहूर्तावर ऑक्‍टोबरला सौद्यात प्रति क्‍विंटल गुळाला ३८०० पासून ५२०० रुपये पर्यंत दर आला. हा दर दहा दिवसच राहिला. नोव्हेंबरपासून मात्र तो उतरण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबरमध्ये हा दर ३६०० पासून ४७५० रुपये पर्यंत आला. 

हा दर स्थिर राहील, या अपेक्षेने मार्केट यार्डमधील गुळाची आवक वाढू लागली. तसा गुळाचा दर कमी येऊ लागला. नोव्हेंबरमध्ये दर आठवड्याला  गुळाच्या दरात घसरण होत राहिली. डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यातील सौद्यात प्रतीनुसार ३००० ते ४४०० रुपये रुपयावर आला. सौद्यात निघालेल्या दरात चारशे ते पाचशे रुपये कमी-अधिक शेतकरी गृहीत धरतो. मात्र हा फरक हजार ते दीड हजारावर आल्याने गूळ उत्पादक शेतकरी अस्वस्थ होऊ लागला. डिसेंबरअखेर गुळाचा भाव प्रति क्‍विंटल २९०० ते ४२०० रुपये आला.

नवीन वर्षात तरी गुळाचा भाव वाढेल, मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुळाचा भाव पाहून शेतकऱ्याला धडकीच भरली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुळाचा भाव प्रति क्‍विंटल २७०० रुपयांवर आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT