पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवेचे जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा नुकतीच सुरू झाली. विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यासोबत बंगळूर व हैदराबादसाठीही बुकिंग होत असल्याची माहिती ‘इंडिगो’ व ‘अलायन्स एअर’ या दोन्ही कंपन्यांतर्फे देण्यात आली. 

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर - तिरुपती विमानसेवा सुरू झाली. पहिल्या सहा फेऱ्या हाउसफुल्ल गेल्या आहेत. अजूनही तिरुपतीसाठी बुकिंग सुरू आहे. शालेय सुट्यांचा हंगाम 
असल्याने अनेक जण कुटुंबासह पर्यटनाला जात आहेत. सर्वसामान्य तसेच नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने हैदराबादकडे जाणारे नियमित प्रवासी अशा दोन्ही वर्गांचा या विमानसेवेला प्रतिसाद मिळत आहे.  

येत्या १५ जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यापुढील बुकिंगही करण्यात येत आहे. बहुतांश शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवसांना बुकिंगची मागणी होत आहे. यापूर्वी सुरू झालेल्या कोल्हापूर-बंगळूर या सेवेलाही चांगला प्रतिसाद आहे. यात आयआयटीयन्सची संख्या जास्त आहे.

कोल्हापूर-मुंबई सेवेसाठी प्रयत्न 
‘उडान’ योजनेत कोल्हापूर - हैदराबाद व कोल्हापूर - बंगळूर या मार्गावर पाच महिन्यांपासून विमानसेवा सुरू झाल्या आहेत. यात कोल्हापूर - हैदराबाद मार्गावर इंडिगो कंपनीला तर कोल्हापूर - मुंबई मार्गावर टू जेट व घोडावत ग्रुपच्या स्टार एअरला मंजुरी मिळाली आहे; मात्र मुंबईत स्टॉलची अडचण असल्यामुळे अजून ही सेवा सुरू नाही. ही सेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; तसेच विमानतळावर नाईट लॅण्डिंगची सेवा सुरू करण्याबाबतचे विमान सेवा प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.

ऑनलाईन आणि थेट विमानतळावरील तिकीटगृहावर तिकीट खरेदी करता येते. ज्येष्ठ नागरिकांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना विमान प्रवासाची संधी सुलभ बनली आहे.  
- कमलकुमार कटारिया,
विमान पत्तन प्राधिकरण अधिकारी

तिकीट काढणे सोपे

  •  उजळाईवाडी विमानतळावर ‘इंडिगो’, 
  •  ‘अलायन्स एअर’ कंपन्यांचे स्वतंत्र तिकीटघर
  •  ओळखपत्रासाठी आधारकार्ड, दोन फोटो हवेत
  •  कक्षात थेट तिकीट काढल्यास अतिरिक्त शुल्क नाही 
  •  ऑनलाईन तिकीट सेवाही सुरू 
  •  दोन्ही कंपन्यांच्या संकेतस्थळावर सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT