Kalamba Jail esakal
कोल्हापूर

Kalamba Jail : कळंबा कारागृहात चाललंय तरी काय? दोन दिवसांत सापडले 10 मोबाईल; आतापर्यंत 80 हून अधिक मोबाईल जप्‍त

३० मार्चपासून कळंबा कारागृहाच्या करण्यात आलेल्या तपासणीत ८० हून अधिक मोबाईल मिळाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

३० एप्रिलपासून सांगली कारागृहाचे अधीक्षक विवेक झेंडे (Sangli Jail Superintendent Vivek Zende) यांच्याकडे कळंबा कारागृहाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

कोल्हापूर : कळंबा कारागृहामध्ये (Kalamba Jail) राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन कोल्हापूर क्लीन’ मोहिमेत (Operation Kolhapur Clean Mission) पुन्हा दहा मोबाईल सापडले आहेत. कारागृह अधीक्षकपदी विवेक झेंडे प्रतिनियुक्तीवर रूजू झाले असून, त्यांनी दोन दिवसांच्या तपासणीत हे मोबाईल जप्त केले.

दरम्यान, यापुढेही सातत्याने अशी तपासणी करून गैरप्रकारांना आळा घातला जाईल, असे श्री. झेंडे यांनी सांगितले. ३० मार्चपासून कळंबा कारागृहाच्या करण्यात आलेल्या तपासणीत ८० हून अधिक मोबाईल मिळाले आहेत. ३० एप्रिलपासून सांगली कारागृहाचे अधीक्षक विवेक झेंडे (Sangli Jail Superintendent Vivek Zende) यांच्याकडे कळंबा कारागृहाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी येताच आणखी १० मोबाईल शोधून काढले आहेत.

त्यांनी याआधी ऑर्थर रोड कारागृह, तळोजा कारागृह, अमरावती कारागृहामध्ये सेवा दिली आहे. तसेच तुरुंगाधिकारी म्हणून २००२ साली कळंबा कारागृहात कर्तव्य बजावले असल्याने त्यांना येथील माहिती आहे. कळंबा कारागृहात मागील काही महिन्यांत मोबाईल, गांजाचा शिरकाव झाला होता. याविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचे झेंडे यांनी स्पष्ट केले.

कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील समन्वयाअभावी बंद्यांनी याचा गैरफायदा घेतला. गांजा, मोबाईलचा शिरकाव झाल्याने कारागृहाची बदनामी झाली. मात्र, यापुढे अशा प्रकारांवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. मागील तीन दिवसांत १० मोबाईल जप्त करण्यात आले असून, ही मोहीम तीव्र केली जाणार आहे.

-विवेक झेंडे, प्र. कारागृह अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT