100 percent lockdown date declared from 7 september in gadhinglaj for next ten days 
कोल्हापूर

गडहिंग्लजमध्ये दहा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू

अजित माद्याळे

गडहिंग्लज : शहरासह ग्रामीण भागातील गावागावात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरासह तालुक्‍यात दहा दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा आज करण्यात आली. सोमवारपासून  (7) या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळात दूध, वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. बॅंका, पतसंस्थांचा निर्णय सोमवारी होण्याची शक्‍यता आहे. शासकीय कार्यालयातही 50 टक्के उपस्थितीवर कामकाज करण्याची विनंती करण्यात आली.

यासाठी पंचायत समिती सभागृहात सभापती रूपाली कांबळे, उपसभापती श्रीया कोणकेरी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नगरपालिकेत नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष शकुंतला हातरोटे, नगरसेवक राजेश बोरगावे यांच्या उपस्थितीत चेंबर ऑफ कॉमर्सची बैठक झाली. पंचायत समितीतील बैठकीत अमर चव्हाण, उदयराव जोशी, हारूण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, शिवप्रसाद तेली, बाळेश नाईक, वसंत यमगेकर, रियाज शमनजी, दिलीप माने, विद्याधर गुरबे, राजेंद्र तारळे, नागेश चौगुले, जयश्री तेली आदींनी मत व्यक्त केले. 

कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. चर्चेअंती सोमवारपासून दहा दिवस तालुका बंद करण्याचा निर्धार करण्यात आला. पालिकेतील बैठकीत नगराध्यक्ष स्वाती कोरी, नितीन देसाई, रामदास कुराडे, प्रकाश मोरे, योगेश शहा, दिपक कोळकी, महेश शहा, योगेश शहा, रवींद्र घेज्जी, श्री. गंधवाले, श्रीनिवास वेर्णेकर, सागर कुराडे, संजय खोत, देवदत्त देशपांडे यांनी मत व्यक्त केले.

प्रत्येक व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींची मते अजमावण्यात आली. सर्वांनी बंदला पाठींबा दिला. त्यानंतर सौ. कोरी यांनी शहरात दहा दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊन काळात अत्यावश्‍यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन कोरी यांनी केले. दोन्ही बैठकीनंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून या जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी होण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

मंत्री, आमदारांशी चर्चा

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाला प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी बैठकीतूनच थेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सूचना देण्याची विनंती केली. त्यानुसार श्री. मुश्रीफ व श्री. पाटील यांनी संबंधित प्रशासनाला जनता कर्फ्यू कडक करण्याची सूचना केली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT