Kolhapur To Pune Route Railway Gate esakal
कोल्हापूर

Railway News : कोल्हापूर-पुणे मार्गावरील 11 रेल्वे फाटक बंद; रुकडीतील फाटकाचाही समावेश, काय आहे कारण?

रेल्वे गाड्यांचा प्रवास सुरक्षित व जलद गतीने व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मिरज ते पुणे मार्गावर सर्वाधिक गाड्या धावतात, त्यासाठी असलेल्या रेल्वे मार्गावर दोन गावे किंवा शहराकडे जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडावे लागत होते. त्यासाठी सुरक्षिततेचा भाग म्हणून रेल्वे फाटक आहेत.

कोल्हापूर : रेल्वे गाड्यांचा प्रवास सुरक्षित व जलद गतीने व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या नऊ महिन्यांत कोल्हापूर ते पुणे मार्गावरील (Kolhapur To Pune Route) ११ रेल्वे फाटक बंद केली आहेत. यात रुकडी (ता. हातकणंगले) तील फाटकाचा (Rukadi Railway Gate) समावेश आहे. त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या अर्धा ते पाऊन तासांची वेळेची बचत होणार आहे.

रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेची पाहणी करण्यात आली. त्यानुसार रेल्वेच्या सुरक्षा विभागाने वरील माहिती दिली. कोल्हापूर रेल्वे स्थानकातून एकूण ९ गाड्या सुटतात. तेवढ्याच गाड्या रोज येतात, तर मिरज हे जंक्शन (Miraj Junction) असल्याने दक्षिण व उत्तर भारतातील प्रवास करणाऱ्या गाड्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात होते.

यात मिरज ते पुणे मार्गावर सर्वाधिक गाड्या धावतात त्यासाठी असलेल्या रेल्वे मार्गावर दोन गावे किंवा शहराकडे जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडावे लागत होते. त्यासाठी सुरक्षिततेचा भाग म्हणून रेल्वे फाटक आहेत. रेल्वे येण्याच्या व जाण्याच्या वेळेत फाटक बंद होतात. तरीही काही वेळा फाटकातून वाकून जाणारे पादचारी, दुचाकीस्वार, सायकलस्वार किंवा जनावरे यांचा अडथळा होतो.

तेव्हा रेल्वेचा वेग कमी होतो तर काही वेळा रेल्वे फाटक बंद करण्यात विलंब झाल्यास सिग्नल मिळाला नाही तर रेल्वे फटकाच्या मागेच थांबून राहतात आदी तांत्रिक समस्या उद्भवातात. पुणे ते कोल्हापूर मार्गावरील ११ फाटकावर वर्दळ मोठी असते. अशा फाटकावर उड्डाणपूल किंवा भुयारी पूल बांधण्यात आले. त्यामुळे रेल्वे रूळावरून किंवा खालून रस्त्यावरील वाहनांची वाहतूक सुरू झाली.

परिणामी फाटकाचा वापर करावा लागणार नाहीत असे फाटक बंद करण्यात आले. कोल्हापुरातील रुकडी (ता. हातकणंगले) येथेही उड्डाण पूल झाला आहे. इचलकरंजी ते कोल्हापूर मार्गावरील वाहतूक उड्डाणपुलावरून होत असल्याने रेल्वे फाटकाचा वापर करा लागणार नाही. पुणे ते मिरज मार्गावरील उर्वरित दहा फाटक बंद केली आहेत. यात पुणे ते दौंड मार्गावरील दोन, दौंड ते बारामतीतील मार्गावरील दोन मिरज ते सातारा मार्गावरील सहा फाटकांचा समावेश आहे.

प्रवासाचा एकूण वेळ कमी होणार

पुणे व मिरज मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या व फेऱ्या येणाऱ्या काळात वाढणार आहेत. या गाड्यांचा वेग नियमित रहावा किंवा वेगात वाढ झाली तरी रेल्वे प्रवासाचा एकूण वेळ कमी होणार आहे. त्यादृष्‍टीने रेल्वे प्रवाशांचीही सोय होणार आहे, अशी बाब सुरक्षा विभागाने नोंदवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT