

MP questions Speaker over speaking time
Esakal
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू झालं आहे. पहिला आठवडा पेपरफुटी प्रकरणी आंदोलन आणि त्यावर चर्चा यामुळे कामकाज होऊ शकलं नव्हतं. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चेवेळी गदारोळ झाला. यातच लोकसभा खासदाराला बोलण्यासाठी फक्त तीन मिनिटं दिल्यानं खासदार नाराज झाले. त्यांनी मी तीन मिनिटं बोलणार नाही असं सांगत नाराजी व्यक्त केली. यावर पीठासीन सभापतींनी खासदाराला समाजवण्याचा प्रयत्न केला.