12.05 average rain register in kolhapur district till today above this 24 hours in kolhapur
12.05 average rain register in kolhapur district till today above this 24 hours in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपर्यंत सरासरी 12.05 मिलीमीटर पाऊसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात आज सकाळपासून पुन्हा भूरभूर पाऊस सुरू झाला आहे. सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तांसात जिल्ह्यात एकूण 144.55 तर सरासरी 12.05 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल रात्री आठवाजता पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 16 फूट 10 इंच होती. तर हीच पातळी सकाळी आठवाजता 15 फूट 7 इंच पर्यंत खाली आली आहे. 

अरबी समुद्रांत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चार दिवसापूर्वी जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाची रिपरिप होती. त्यानंतर काल काही प्रमाणात उघडीप होती. मात्र आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची भूरभूर पुन्हा सुरू झाली. हवामान ढगाळ असून हवेत गारवाही निर्माण झाला आहे. सकाळी दहापर्यंत झालेल्या पावसाच्या सरी तासाभरानंतर कमी झाल्या आहेत. मात्र डोंगरी भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. 

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळसह भोगावतीनदीवरील खडककोगे बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात दुपारनंतर परिस्थिती पूर्ववत होत चालली असली तरीही सायंकाळी पावसाची रिमझिम सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे संकेत आहेत. सध्याच्या पावसामुळे शहरातील जनजीवनावर कोणताही परिणाम झालेला नाही. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT