15 foot python found in belgaum area wait also very high 
कोल्हापूर

बेळगावात १५ फुटी अजगराची दहशत ; दिसला पण सापडलाच नाही

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शास्त्रीनगर येथे गुरुवारी (१) रात्री अजगर आढळला. त्यामुळे शास्त्रीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री एक वाजेपर्यंत स्थानिक रहिवाशांनी व तरुणांनी एकत्र येवून अजगर पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश मिळाले नाही. या अजगराचा व्हिडीओ व त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शुक्रवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यात एकाने अजगराचे शेपूट पकडून ठेवल्याचे दिसते. या अजगराचे संपूर्ण चित्रणही त्या व्हिडीओत आहे. 

शास्त्रीनगर नववा क्रॉस येथे एक खासगी मालकीची खुली जागा असून त्या जागेत झुडपे वाढली आहेत. तेथील एका मोठ्या खड्ड्यात पाणी साचले असून त्यातच हा अजगर आढळून आला. तेथील नागरिकांनी रात्री सर्पमित्र गणेश दड्डीकर व राजू फडतरे यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी अजगर पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांनाही यश आले नाही. आता वन खात्याची मदत घेऊन अजगर पकडण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

दरम्यान, अजगर अद्यापही तेथेच असल्याने तेथील रहिवासी धास्तावले आहेत. खुल्या जागेपासून काही अंतरावर लेंडी नाल्याचे पात्र आहे. त्या लेंडी नाल्यातून अजगर आला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. शास्त्रीनगरसारख्या नागरी वसाहतीत अजगराचा वावर पाहून सर्पमित्रांनाही आश्‍चर्य वाटले आहे. अनेकदा घोणस साप अजगर असल्याचे समजून सर्पमित्रांना बोलावले जाते. त्यामुळे शास्त्रीनगर येथे आढळलेला घोणस असावा, असा अंदाजही व्यक्त झाला. परंतु, तो घोणस नसल्याचे दड्डीकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भात उपवन संरक्षण अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून वन खात्याचे अधिकारी शनिवारी सकाळी शास्त्रीनगर येथे येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडीओ पाहता तो अजगर असल्याचे स्पष्ट होते. १५ फुटापेक्षा जास्त लांबीचा तो दिसत असून त्याची जाडीही जास्त आहे.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सटाण्यात भाजपाच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची जोरदार एंट्री

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले

Uttarakhand Tourism: उत्तराखंडला फिरायला जाताय? लपलेली मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं अनुभवायला विसरू नका!

SCROLL FOR NEXT