Shahu Jayanti 2024 sakal
कोल्हापूर

Shahu Maharaj Jayanti 2024 : कोल्हापूरात राजर्षी शाहूंच्या विचारांचा जागर

शतकोत्तर सुवर्ण जयंती शाळा, महाविद्यालये, संस्थांत अभिवादन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राजर्षींच्या कार्याचा जागर केला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहर परिसरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच संस्था, संघटनांतर्फे आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राजर्षींच्या कार्याचा जागर केला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. अनेक ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले.

लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राजर्षींना अभिवादन

‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवावे व त्यांच्या विचारांचा सन्मान करावा, अशी विनंती पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे ते बोलत होते.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथील राजर्षींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. ते म्हणाले, शाहूराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवानिमित्त शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत.

राजर्षींचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत आणि रयतेच्या राज्याची माहिती संपूर्ण देशाला व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहोत.’ यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित,

इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह माजी नगरसेवक, श्रीराम सेवा संस्थेचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, दिवसभर शाहूप्रेमींनी जन्मस्थळी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT