1993 blast accused death of in inmate beating at kalamba jail Kolhapur  esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

Kolhapur Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात एका कैद्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन गटातील मारहाणीत एका कैद्याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात एका कैद्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन गटातील मारहाणीत एका कैद्याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रेनेजवर झाकण्यात येतो त्या झाकणाने पाच कैद्यांनी मारहाण करून कैद्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असून आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असताना त्याचा खून करण्यात आला आहे.

न्यायालयीन बंदी असलेल्या आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेशा पाटील, दीपक नेताजी खोत,संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेज वरील लोखंडी झाकणाने मुन्नाला मारहाण केली. या हल्ल्यात मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये कळंबा कारागृहात कैद्यांकडे थोडे ८० पेक्षा जास्त मोबाईल आढळल्याची माहिती आहे. या प्रकरणी कारागृहातील दोन अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई देखील करण्यात आली होती. तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT