कोल्हापूर

पैशापेक्षा माणसं, फॅमिली जपूया! 24 तासांत आम्ही आई-वडिल गमावलेत

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : ‘‘आम्ही २४ तासांत आमच्या आई-वडिलांना (father and mother dead) गमावलं आहे. आमच्या चौकोनी कुटुंबात आता आम्ही दोघेच उरलोय. सारं काही आठवलं की अजूनही अंगावर काटा येतो. शुक्रवारी सारे विधी आटोपून आम्ही ‘रुटीन’ सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. (covid -19) पण, आता आई-वडिलांची किंमत कळतेय. ते येतात आणि जातातही. पण, त्यापेक्षा या महामारीच्या काळात आपण आपली माणसं, फॅमिली जपूया, (take care of family) असे कळकळीचं आवाहन विकी आणि ममता जैन या भावा-बहिणीनं ‘सकाळ’च्या माध्यमातून साऱ्यांना केलं आहे.’’ (24 hours dead father and mother take care of family)

जैन कुटुंब राहायला मंगळवार पेठ राम गल्लीतील अपार्टमेंटमध्ये. विकी २७ वर्षाचा, तर ममता २६ वर्षांची. शिक्षणानंतर आता त्यांचं करिअर आणि लग्नाचा विषय सुरू झालेला. पण, या आनंदी कुटुंबाला कोरोनानं विळखा घातला आणि साऱ्यांच्याच स्वप्नांना खीळ बसली. विकी आणि ममताचे वडील मदनलाल चांदीच्या मनगटीचं काम करणारे. ते परगावी गेले आणि आल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना कोविड सेंटरला आणि तिथून सीपीआरला आणले गेले. उपचारानंतर त्यांची प्रकृतीही सुधारली. दरम्यान, पाच सप्टेंबरला आई गुणवंती यांच्या मनातील भीतीमुळे त्यांनाही त्रास जाणवू लागला. त्यांच्यावरही उपचार सुरू झाले. यावेळी विकी व ममताचीही चाचणी केली आणि त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पण, लक्षणे नसल्याने ते होम (home quarantine) क्वारंटाईन झाले.

दरम्यानच्या काळात मामा अंबालाल जैन विकी व ममताच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी सर्व जबाबदाऱ्या उचलल्या. पीपीई किट घालून जेवू घालण्यापर्यंत त्यांनी सारी कामं केली. १२ मे रोजी मदनलाल यांना डिस्चार्ज मिळणार होता. पण, तत्पूर्वी ११ रोजीच शेजारील एक रुग्ण समोरच दगावल्याने त्यांना धक्का बसला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, ही माहिती विकी व ममताला दिली नाही. वडिलांच्या डिस्चार्जच्या निमित्ताने हे दोघेही सीपीआरमध्ये गेले आणि त्याचदिवशी सकाळी आईचेही निधन झाल्याची माहिती त्यांना दिली.

२४ तासांत जन्मदात्या आई-वडिलांना असं गमवावं लागल्यानं त्यांच्या पायाखालची वाळूच घसरली. पण, नातेवाइकांनी त्यांना धीर दिला आणि ते आईच्या अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले. पुढे दोन दिवस नातेवाइकांकडेच राहिले आणि त्यानंतर घरी आले. सारं घर खायला उठलं. पण, आपण खचून चालणार नाही. आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नेटानं साऱ्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, याची जाणीव झाली आणि हे भाऊ-बहीण त्यासाठी सज्जही झाले. (क्रमशः)

"लसीकरण करून घ्या. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन करा. कुठलेही दुखणं अंगावर काढू नका. अनावश्यक बाहेर पडून गर्दी करू नका. आपली माणसं बघता बघता आपल्याला सोडून जातात, त्याचं दुःख काय असतं, हे आम्ही अनुभवत आहे."

- विकी व ममता जैन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

SCROLL FOR NEXT