30 Crore Increase In Ichalkaranji's Budget Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीच्या अंदाजपत्रकात 30 कोटींची वाढ 

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : पालिकेच्या स्थायी समिती सभेत 2021-22 च्या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी प्रशासनाने मांडलेल्या अंदाजपत्रकात सुमारे 30 कोटी रुपयांची वाढ स्थायी समितीकडून सूचवली. त्यानुसार आवश्‍यक ती दुरुस्ती करुन अंदाजपत्रक पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. 

नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यापूर्वी 15 जानेवारीला झालेली स्थायी समितीची सभा तहकूब केली होती. आज ही सभा झाली. यापूर्वी सर्वच सभापतींनी आपापल्या विभागाला भरीव तरतुदीची मागणी केली होती. तसेच विविध उत्पन्नाचे स्रोत सुचवले होते. आज पुन्हा यावर सविस्तर चर्चा केली.

विशेष करून शासनाकडून मिळणाऱ्या सहायक अनुदानातील कपातीवर चर्चा केली. सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. पालिका फंडातून कामे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. मक्तेदारांची देणी प्रथम अदा करावीत, त्यानंतरच पालिका फंडातून विकासकामांची निविदा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. पालिका प्रशासनाकडून तयार केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने सुमारे 30 कोटींची वाढ सुचवली आहे. त्यानुसार अंदाजपत्रकात दुरुस्ती करून मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर शिफारस करण्याचा निर्णय झाला. 

चर्चेत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, आरोग्य सभापती संजय केंगार, पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, महिला व बालकल्याण सभापती सारिका पाटील, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, सदस्य सागर चाळके, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह विविध खातेप्रमुख सहभागी झाले होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT