Growth
Growth sakal
कोल्हापूर

कोल्‍हापूर : उत्‍पन्न वाढीसाठी ३६ मालमत्ता ‘टार्गेट’

सदानंद पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : गेली अनेक वर्षे जिल्‍हा परिषदेच्या मालमत्तांचा शोध सुरू होता. याला बऱ्यापैकी यश आले असून, आजअखेर ४१२१ मालमत्तांची माहिती जिल्‍हा परिषदेला मिळाली आहे. यात खुल्या जागा, मैदाने, शाळा, मंदिरे, शासकीय कार्यालये, आरोग्य व पशुसंवर्धन दवाखाने, अंगणवाड्या, गाव तलाव आदींचा समावेश आहे. १२ विभागांमध्ये त्या विभागल्या असून, आता नोंद मिळाल्याने अतिक्रमण असेल किंवा त्यांचा आगामी काळात व्यावसायिक वापर करुन जिल्‍हा परिषदेचे उत्‍पन्‍न वाढीस मदत होणार आहे. पहिल्या टप्‍प्यात अशा ३६ मालमत्तांना टार्गेट केल्या आहेत. ४१२१ पैकी सर्वाधिक १५९८ या शिक्षण विभागाच्या आहेत. तर राधानगरी तालुक्यात तब्‍बल ७०६ मालमत्ता आहेत.जिल्‍हा परिषदेचे उत्‍पन्‍न कमी होत असल्याने विकासकामांसाठी निधीची कमतरता जाणवते. उत्‍पन्‍न वाढीसाठी प्रयत्‍न करावेत, अशी चर्चा स्‍थायी समिती व सर्वसाधारण सभेत होत असते. पाच वर्षांपूर्वी मालमत्ता विकास अधिकाऱ्याची नेमणूक केली.

गावागावात जिल्‍हा परिषदेच्या खुल्या जागा, इमारती, मैदाने याचबरोबर गाव तलावही आहेत. ते सर्व जिल्‍हा परिषदेच्या विविध विभागांच्या नावे आहेत. अनेक मालमत्ता अजुनही जिल्‍हा परिषदेच्या नावे नाहीत. त्याबाबत वादही निर्माण झाले आहेत.ज्याबाबत वाद नाही, नावावर आहे आणि मोक्याच्या ठिकाणी आहे त्यांचा वापर उत्‍पन्‍न वाढीसाठी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्‍प्यात अशा ३६ मालमत्तांना टार्गेट करण्यात आल्या आहेत. त्या तत्‍काळ वापरण्यायोग्य आणि जिल्‍हा परिषदेला चांगले उत्‍पन्न देऊ शकतात, असा विश्‍‍वास बांधकाम विभागाला आहे, तर कोणत्या मालमत्तांचा विकास टप्‍प्याने करायचा, याचेही नियोजन सुरू आहे.

लिलावाने चालविण्यास योग्य मालमत्ता दाजीपूर ओलवण धर्मशाळा, हवामहल बंगला (इचलकरंजी), सामानगड रेस्‍ट हाउस (गडहिंग्‍लज), कृष्‍णकुंज बंगला (गगनबावडा), गडहिंग्‍लज रेस्‍ट हाउस या मालमत्ता व्यावसायिक दृष्‍टीने चालविण्यास देण्यायोग्य आहेत. त्यादृष्‍टीने बांधकाम विभाग प्रयत्‍न करीत आहे. गोपाळ तीर्थ बाग (पन्‍हाळा), वाडी रत्‍नागिरी येथील रेस्‍ट हाउस भाड्याने दिले. पेठवडगाव येथे जनावरांच्या दवाखान्याच्या परिसरात ३५ दुकानगाळे बांधण्याचा प्रस्‍ताव दिला आहे.

उत्‍पन्न वाढीसाठी माहिती संकलन व ‍सर्वेक्षण सुरू आहे. पहिल्या टप्‍प्‍यात ३६ मालमत्तांचा विकास शक्य आहे. त्या भाडेतत्त्वावर देण्यासाठी फार निधी खर्च होणार नाही. त्या तत्‍काळ भाडेतत्त्वावर देऊन उर्वरित मालमत्तांचा बांधा, वापरा व हस्‍तांतरित करा, या तत्त्वावर विकास करून जि. प.चे उत्‍पन्‍न वाढविले जाईल.

- महेंद्र क्षीरसागर, कार्यकारी अभियंता, बांधकाम

मालमत्तांची स्‍थिती

विभागाचे नाव संख्या

गटविकास अधिकारी ७

आरोग्य विभाग ४२४

पाणीपुरवठा १८२

बांधकाम ३९३

महिला-बालकल्याण १३७४

वित्त १

शिक्षण १५९८

सामान्य प्रशासन ५५

पशुसंवर्धन ८७

एकूण ४१२१

मालमत्तांची टक्‍केवारी

शिक्षण विभाग ३८.८

महिला-बालकल्याण ३३.३

बांधकाम ९.५

आरोग्य १०.३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT