36 year old woman acid attack in raibag belgaum 
कोल्हापूर

भर बाजारपेठेत महिलेच्या अंगावर अॅसि़ड ओतून हल्लेखोर फरार; त्याने ही केले विष प्राशन

सकाळ वृत्तसेवा

रायबाग (बेळगाव) : येथील फळविक्रेत्या महिलेवर शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अॅसिडचा हल्ला झाला. यास्मिन तहसिलदार (वय ३६) असे तिचे नाव आहे. गंभीर अवस्थेत तिला बेळगाव येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला करणाऱ्या अण्णाप्पा सेठ याने विष प्राशन केले असून त्यालाही जिल्हा रूग्णालयात हालविण्यात आले आहे. दोघांवर बेळगाव जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास करण्यात येत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी,

यास्मिन तहसिलदार ही रायबाग येथील जनता कट्टी रोडवर फळविक्रीचा व्यवसाय करते. तेथे येऊन यास्मिनच्या अंगावर शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास अण्णाप्पा सेठ याने बाटलीतून आणलेले अॅसिड फेकले. त्यानंतर तो पळून गेला. माहिती मिळताच रायबाग ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेतील यास्मिनला तातडीने रायबाग येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मात्र गंभीर जखमी असल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अण्णाप्पा हा काही वेळानंतर पोलिसात दाखल झाला. पण हल्ल्यानंतर त्याने विष प्राशन केल्याने तो देखील अत्यवस्थ आहे. या दोघांवर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अॅसिडने हल्ला कशामुळे झाला ते समजू शकलेले नाही. रायबाग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

आजचे राशिभविष्य - 04 ऑक्टोबर 2026

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

SCROLL FOR NEXT