Human Skulls Found in River Dudhganga esakal
कोल्हापूर

Kolhapur : दूधगंगा नदी पात्रात आढळल्या 4 मानवी कवट्या; सांगाडा गायब; परिसरात खळबळ

ज्या ठिकाणी कवट्या सापडल्या, त्या ठिकाणापासून केवळ दोनशे मीटरवर स्मशानभूमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

भोंदू बाबांकडून या कवट्यांचा वापर अघोरी करणीसाठी झाला आहे की काय, इतक्या कवट्या एकावेळी कशा मिळाल्या, त्या येथे का टाकण्यात आल्या, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सिद्धनेर्ली : येथील दूधगंगा नदीच्या (Dudhganga River) पात्रात चार मानवी कवट्या आढळल्या. तीन पूर्ण तर चौथी दोन तुकडे झालेल्या अवस्थेत आहे. कागल पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत.

हा घातपाताचा प्रकार आहे की जादूटोणा वा अघोरी करणी यासाठी कवट्या वापरल्या आहेत, याबाबत ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

एकाच वेळी चार कवट्या सापडल्यामुळे भीतीचेही वातावरण आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) प्रिया पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः दूधगंगेच्या येथील पात्रात पाण्याची पातळी कमी झाली आहे.

त्यामुळे शुक्रवारी काही ग्रामस्थांना पात्रात एक कवटी दिसली होती; मात्र याबाबत पोलिस ठाण्यात कुणी कळविले नाही. आज पोलिस पाटील उद्धव पोतदार यांनी याबाबत पोलिसांना कळवले. घातपाताच्या शक्यतेने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एक कवटी ताब्यात घेतली. याच दरम्यान या पहिल्या सापडलेल्या कवटीपासून काही अंतरावर आणखी तीन कवट्या पोलिसांना आढळल्या.

या सर्व कवट्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ज्या ठिकाणी कवट्या सापडल्या, त्या ठिकाणापासून केवळ दोनशे मीटरवर स्मशानभूमी आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धनेर्लीमध्ये भोंदू बाबांचे प्रस्थ वाढल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. बामणी येथील ग्रामपंचायतच्या (Bamani Gram Panchayat) निवडणुकीवेळी काही जण परिसरात आले होते.

फॉरेन्सिक तपासणीची मागणी

या भोंदू बाबांकडून या कवट्यांचा वापर अघोरी करणीसाठी झाला आहे की काय, इतक्या कवट्या एकावेळी कशा मिळाल्या, त्या येथे का टाकण्यात आल्या, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, कवट्यांची फॉरेन्सिक तपासणी करावी व यामागे असलेले गूढ उकलावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT