50 beds covid center start dudhali pavilion under the observation of commissioner kalshetty in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात दुधाळी पॅव्हेलियनवर उभारतंय 50 बेडचे कोव्हिड केअर सेंटर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दुधाळी पॅव्हेलियन येथे नवीन कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून या कोव्हिड केअर सेंटरच्या उभारणीच्या कामाची आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज पाहणी केली. 50 बेडचे हे कोव्हिड केअर सेंटर सर्व सुविधायुक्त करण्यावर अधिक भर असून सर्व संबंधितांनी सेंटरच्या उभारणीचे काम अधिक गतीने करावे, अशी सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली. 

नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या पुढाकाराने व लोकसहभागातून दुधाळी पॅव्हेलियन येथे नवीन कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात येत असून हे केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याच्याद्‌ष्टीने महापालिका प्रशासन आणि नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांचे प्रयत्न आहेत. या कोव्हिड केअर सेंटरचे कपिल अधिक यांच्यामार्फत मोफत पेंटिंग करून देण्यात येत आहे ही समाधानाची बाब आहे.

नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या पुढाकाराने व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या या कोव्हिड केअर सेंटरसाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांनी नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्याशी संपर्क साधून आवश्‍यक ती मदत करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. यावेळी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, उमेश माने आदी उपस्थित होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT