50 lakh per day in the municipal coffers 
कोल्हापूर

महापालिकेच्या तिजोरीत दिवसात 50 लाख

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागाने सवलतीत घरफाळा भरण्याच्या योजनेला आजही उदंड प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या पाचही नागरी सुविधा केंद्रावर घरफाळा भरण्यासाठी आज गर्दी झाली. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत एका दिवसात 50 लाख रुपये जमा झाले.

शहरातील 2020-2021 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिले ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. आज दिवसभरात नागरी सुविधा केंद्रावर लोकांनी रांग लावून सुमारे 43 लाख 1 हजार रक्कम जमा केली. ऑनलाइनद्वारे 7 लाख 05 हजार रुपये रक्कम जमा केली आहे. दिवसभरात घरफाळ्यापोटी 50 लाख विक्रमी रक्कम एकाच दिवशी जमा झाली. नागरिकांनी सहा टक्‍के सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने घरफाळा भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांनी केले आहे. 

सकाळी दहा वाजल्यापासूनच महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात घरफाळा भरण्यासाठी गर्दी होऊ लागली. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र, तसेच मुख्य इमारतीतील नागरी सुविधा केंद्रात नागरिकांनी घरफाळा भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या. 


येथे भरू शकता घरफाळा (ऑनलाईनसह) 
शहरातील मिळकतधारकांनी
http://kolhapurcorporation.gov.in:8080/kmcop/Mi/CitizenLogin.aspx या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अथवा महापालिकेच्या पाचही नागरी सुविधा केंद्रांत सकाळी 8.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत घरफाळा, कराचा भरणा करून सहकार्य करावे.

ऑनलाईन भरणा करताना काही अडचणी असल्यास महापालिकेच्या डेटा सेंटर (फोन 0231-2540988) या नंबरवर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे काही तक्रार अथवा माहिती आवश्‍यक असल्यास propertytax@kolhapurcorporation.gov.in वर आपल्या e-mail नंबरसह तक्रार नोंद करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT