8 more corona patient found karanjfen panhala kolhapur 
कोल्हापूर

करंजफेण हादरले : एकाच वेळी व एकाच कुटुंबातील एवढेजण झाले बाधित

राजेंद्र दळवी

आपटी (कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील ६७ वर्षीय वृद्ध मंगळवारी रात्री कोरोना बाधित झाला होता. त्यावेळी सुरक्षतेच्या दृष्टीने बाधित वृद्धाच्या प्रथम संपर्कातील तेरा जणांनाची तपासणी करण्यात आली होती.त्यापैकी वृद्धाच्या घरातील आठ व्यक्तींचा अहवाल  पॉझिटिव्ह आला असून बाकी पाच जणांचा अहवाल  निगेटिव्ह आला आहे. एकाचवेळी आठ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने करंजफेण हादरले असून परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.तर सुरक्षतेच्या दृष्टीने प्रशासनाकडून बाधितांच्या  प्रथम संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

करंजफेण येथील मंगळवारी कोरोना बाधित झालेला वृध्द वयोमानानुसार नियमित आजारी असे. आजारी असल्याने त्याने प्रथम कोतोली येथे उपचार घेतले होते. त्याच वेळी कोतोली येथे त्यांच्या रक्ताचीही तपासनी करून घेतली होती. त्याला कोल्हापूर येथे उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याची कोरोना
चाचणी करण्यात आली तेव्हा तो बाधित असल्याचे सिद्ध झाले.त्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टीने प्रशासनाने त्याच्या प्रथम संपर्कातील तेरा जणांची तपासणी केली. त्यामध्ये वृद्धाच्या घरातील दहा तर त्याने रक्ताची तपासणी केलेल्या लॅब मधिल तीन जणांचा समावेश होता.

पन्हाळा तालुक्यातील रुग्णांची संख्या अर्धशतकाच्या जवळ

या सर्वांचा कोरोना अहवाल प्रशासनास प्राप्त झाला.त्यामध्ये वृद्धाची ६० वर्षीय पत्नी,दोन मुलगे,दोन सुना,तीन नाती अशा वृद्धा कुटूंबातील आठ जणांचा समावेश  आहे.तर लॅब मधिल तीन जणांसह अन्य दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आज बाधित झालेल्या वृद्धाच्या दोन मुलांपैकी एक मुलगा व सून वकील असून ते कोल्हापुरात राहतात.त्या दोघांबरोबरच त्यांच्या दोन मुलींचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे.त्यामुळे प्रशासनाला बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबवावी लागत आहे. एकाच वेळी व एकाच कुटुंबातील आठ जण बाधित होण्याची ही पन्हाळा तालुक्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे करंजफेण व परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावचे गजानन महाराज संस्थान, १ कोटी ११ लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीत

Asian Games 2026 : नवी मुंबईच्या Harita Bhadra ने ०.०१ सेकंदाच्या फरकाने जिंकले पदक; आहे भारताची दुसरी सर्वात वेगवान धावपटू

Election Commission controversy: मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाण यांची ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी

चीन अमेरिकन कंपन्यांचे AI तंत्रज्ञान चोरत आहे का? पाहा 'डिस्टिलेशन' म्हणजे काय? ज्यावरून USA अन् China मध्ये रंगलाय वाद...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT