Shivsena Mahaadhiveshan Kolhapur esakal
कोल्हापूर

कोल्हापुरात येणार 9 मंत्री, 43 आमदार, 13 खासदार; 100 हाॅटेलमध्‍ये 2000 खोल्यांचं बुकिंग, काय आहे कारण?

शुक्रवार, शनिवार दोन दिवस महासैनिक दरबार येथे हे अधिवेशन होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील सुमारे शंभराहून अधिक हॉटेलमधील दोन हजाराहूंन अधिक खोल्यांचे बुकिंग शिवसेनेकडून झाले आहे. शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दोन दिवस कोल्हापुरात असणार आहेत.

कोल्हापूर : खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह राज्यातील नऊ मंत्री, ४३ आमदार, १३ खासदार शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या (Shivsena Mahaadhiveshan) निमित्ताने येथे येत आहेत. शुक्रवार, शनिवार दोन दिवस महासैनिक दरबार येथे हे अधिवेशन होत आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिली.

दरम्यान, दीड दिवसांच्या अधिवेशनात तीन सत्र असतील. शनिवारी सायंकाळी गांधी मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. त्याची पहाणी आज करण्यात आली. साधारण दोन हजारांहून पदाधिकारी सलग तीन दिवस येथे असतील. पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होईल. पक्ष संघटनेच्या आढावा घेतला जाईल. पक्षाच्या दृष्टीने महत्त्‍वपूर्ण राजकीय ठराव मांडले जातील. त्यावर विचार विनिमय व चर्चा होणार आहे. ते राजकीय ठराव दुसऱ्या सत्रामध्ये मंजूर केले जातील.

तिसऱ्या सत्रामध्ये निवडणुकांच्या तयारी संदर्भात चर्चा होईल. या सत्रात आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारीबाबतपक्षाचे ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वरिष्ठ नेते आणि पदाधिऱ्यांमध्ये खुली चर्चा या सत्रात होणार आहे व नंतर सत्राचा समारोप होईल. सायंकाळी गांधी मैदानात जाहीर सभेने महाअधिवेशनाची सांगता होईल, असेही पावसकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

100 हाॅटेलमध्‍ये दोन हजार खोल्यांचे बुकिंग

जिल्ह्यातील सुमारे शंभराहून अधिक हॉटेलमधील दोन हजाराहूंन अधिक खोल्यांचे बुकिंग शिवसेनेकडून झाले आहे. शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दोन दिवस कोल्हापुरात असणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील आमदार, खासदार, उपनेते, संपर्क नेते, जिल्हा प्रमुख सुद्धा उपस्थित असणार आहेत. त्यांच्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, अनेक पदाधिकारी उद्या (ता.१५) सकाळीच कोल्हापुरात हजर होणार असल्याचीही माहिती क्षीरसागर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT