aam aadmi party entry in kolhapur municipal corporation election 
कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत 'आप'ची उडी ; सर्व जागा लढविणार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - आम आदमी पक्ष (आप) महापालिकेच्या सर्व 81 जागा लढविणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रंगा सचुरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सतरा सदस्य प्रचार समितीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 


सचुरे म्हणाले, कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आप पहिल्यांदाच लढवत आहे. दिल्ली येथील सरकार चालविण्याचा अनुभव आमच्या पाठिशी आहे. राजर्षि शाहू छत्रपती महाराज यांच्या नगरीत महाराजांनी विकासाचे आदर्श मॉडेल उभे केले. मात्र नंतर शहराचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. रस्ते. पाणी अशा मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. ज्या पद्दतीने गेल्या चाळीस वर्षात कोल्हापुरचा विकास व्हायला हवा होता तितका तो झाला नाही. 

येत्या निवडणुकीत विकासाभिमुख, ढपला संस्कृतीला पायबंद घालणारे, विकासाची अंमलबजावणी करणारे उमेदवार दिले जाणार आहेत. शिक्षण, आरोग्य, घरफाळ्यात सुलभता, वाहतूक व्यवस्था, पर्यटन विकास, हद्दवाढ, क्रीडा असे मुद्दे अजेंड्यावर असणार आहेत. त्यात लोकांचे मत विचारात घेतले जाईल. महापालिका निवडणूक काहीसाठी व्यवसाय झाली ओहे. निवडून येण्यासाठी पैसे लावायचे आणि ते काढून घेण्यासाठी प्रयत्न करायचे ही पद्दत मोडित काढण्यासाठी जनतेकडून देणगी घेऊन निवडणूक लढविणार आहोत. सध्या पन्नास हून अधिक उमेदवार आपकडून लढण्यास तयार आहेत. उर्वरीत जागांवर लवकरच उमेदवार दिले जातील. 

पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष नितेश रेडेकर, उतम पाटील आदि उपस्थित होते.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

Nanded Crime: नांदेडमध्ये मध्यरात्री तलवारी खंजरने हल्ला; २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

SCROLL FOR NEXT