Abortion Tablets Racket esakal
कोल्हापूर

Karveer Police : गर्भपाताच्या गोळ्यांचे रॅकेट थेट परराज्यातून; कोल्हापुरात बिनदिक्कतपणे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री?

गर्भपातासाठी (Abortion) बाजारात असलेल्या गोळ्यांची विक्री करणे सहजासहजी शक्य नाही.

सकाळ डिजिटल टीम

सध्या बाजारात खुलेआम विक्री होत असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या या थेट परराज्यातून कोल्हापुरात येत असल्याचे सांगण्यात येते.

कोल्हापूर : गर्भपातासाठी (Abortion) बाजारात असलेल्या गोळ्यांची विक्री करणे सहजासहजी शक्य नाही. त्यासाठी संबंधित डॉक्टरांनी तीन प्रिस्क्रिप्‍शन द्याव्या लागतात. त्याच्या नोंदी डॉक्टर, औषध विक्रेता आणि मुख्य विक्रेता यांच्याकडे असतात. तरीही यासर्व यंत्रणा धुडकावून बिनदिक्कत गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचे नुकतेच करवीर पोलिसांनी (Karveer Police) टाकलेल्या छाप्यात दिसून आले.

याबाबत अधिक माहिती घेतली असता हे रॅकेट थेट परराज्यातून डॉक्टरापर्यंत (Doctor) पोहोचत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मूळ विक्रेता बाजूला ठेवून यांची विक्री होत असल्याची माहिती पुढे येते. राज्यात सर्वाधिक मुलींच्या जन्माचा दर जिल्ह्यातील पन्हाळा (Panhala) तालुक्यात होता. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुढाकार घेतला. पोलिस, आरोग्य यंत्रणेसोबत महसूलमधील अधिकारीदेखील सक्रिय झाले आणि पाहता पाहता हे रॅकेट उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळेच दहा वर्षांपूर्वी मुलींच्या जन्मदरात किंचित वाढ झाली.

पुढे अधिकारी बदलले आणि ‘लेक वाचवा’ अभियान मागे पडले. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळ्या मोकाट सुटल्याचे दिसून येते. पोलिसांकडून होणारी कारवाईसुद्धा आता कमी पडत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या विक्रीच्या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. कारण, अधिकृत गर्भपात करता येतो, त्यासाठी ठोस कारण असावे लागते. ठरावीक हॉस्पिटलना याची परवानगी आहे. त्यासाठी आवश्‍यक गोळ्यांची विक्रीही नोंदणी करून होते. त्यावर औषध प्रशासनाचा वॉच असतो. तरीही कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री खुलेआम होत असल्याचे करवीर पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही नोंदीशिवाय गोळ्यांची विक्री

सध्या बाजारात खुलेआम विक्री होत असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या या थेट परराज्यातून कोल्हापुरात येत असल्याचे सांगण्यात येते. या गोळ्यांची विक्री कोणत्याही अधिकृत विक्रेत्यांकडून होत नाही. यासाठी परराज्यातील विक्रेते थेट डॉक्टरांशी संपर्कात येतात आणि कोणत्याही नोंदीशिवाय या गोळ्यांची विक्री होते. ही विक्री जोपर्यंत थांबविली जात नाही तोपर्यंत अनधिकृत गर्भपात टाळणे शक्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT