accident in gandhinagar kolhapur one lady dead in accident 
कोल्हापूर

कोल्हापूर : चिंचवाडात मूकबधिर महिलेचा रेल्वे इंजिनच्या धडकेत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर (कोल्हापूर) : रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वे इंजिनची धडक बसून अश्विनी अमोल धुमाळे (वय 35 वर्षे, रा.चिंचवाड ता. करवीर) या मुकबधीर महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिंचवाड स्मशानभूमी जवळ घडली.

याबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, अश्विनी ही नेहमीप्रमाणे चिंचवाड येथील इलेक्ट्रिकल दुकानात कामास गेली होती. तिच्या अचानक पोटात दुखू लागल्याने ती चिंचवाड येथील घरी येण्यास निघाली. ती मूकबधिर असल्याने तिला बोलता व ऐकण्यास येत नव्हते. चिंचवाड येथील स्मशानभूमी लगत असणारे रेल्वे रूळ ओलांडून ती घरी जात होती. त्याच दरम्यान रेल्वे इंजिन कोल्हापूरहुन मिरजकडे जात होते.

रेल्वे ड्रायव्हरने हॉर्न केला पण तिला ऐकु न आल्याने रेल्वे इंजिनची जोराची धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या घरामध्ये एक भाऊ व बहीण ही मुकबधीर आहेत. एका मुकबधीर इसमाशी तिचा विवाह झाला आहे. या घटनेने चिचवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची फिर्याद चुलते विजय भाऊ कांबळे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. या अपघाताचा तपास पोलिस हवालदार विराज डांगे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

Strait of Hormuz: मोठी दुर्घटना! 'होर्मुज'मध्ये अडीच हजार कंटेनर्स बुडाले; मालवाहू जहाज धडकलं, सप्लाय चेनवर होणार परिणाम...

Maharashtra Live News : उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेर थरार; डोक्यात दोन गोळ्या झाडून हरीश गजवानी यांची भररस्त्यात हत्या

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

SCROLL FOR NEXT